राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीच्या गोटात दाखल, चर्चेत राहिलेले सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत

राणेंच्या पॅनलचे उमेदवार विठ्ठल देसाईंचा विजय, जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा राणेंचंच वर्चस्व
राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीच्या गोटात दाखल, चर्चेत राहिलेले सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन सुरु झालेल्या राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. नारायण राणे यांची साथ सोडून महाविकास आघाडीची बाजूने गेलेल्या सतीश सावंतांमुळे यंदाची निवडणुक चांगलीच गाजली. सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राणे कुटुंब चांगलंच अडचणीत आलं. भाजप आमदार नितेश राणेंवर याच हल्ल्यामुळे सध्या अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे सतिश सावंत यांचा मतमोजणीत नेमका काय निकाल लागतोय याकडे सर्वांचं लक्ष होतं.

परंतू कणकवलीत सतिश सावंत यांना चुरशीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. चिठ्ठीवर निघालेल्या मताचा कौल हा सावंत यांच्याविरुद्ध गेल्यामुळे विरुद्ध पॅनलचे उमेदवार विठ्ठल देसाई विजय झाले आहेत. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. या निवडणुकीत राणे यांच्या पॅनलने १९ पैकी ११ जागा जिंकत पुन्हा एकदा बँकेवर आपली सत्ता कायम राखली आहे.

राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीच्या गोटात दाखल, चर्चेत राहिलेले सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत
सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेची निवडणुकीत कोणी मारली बाजी कोणाचा पराभव? संपूर्ण निकाल एका क्लिकवर

जिल्हा बँकेसाठी कणकवली तालुक्यात १६५ पैकी १६१ इतके मतदान झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोट्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा होती. मतदानावेळी केंद्रावर जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यात बाचाबाची झाली.

मतदानानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके लावून घोषणाबाजी केल्याने भाजप शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने घोषणा बाजी देत होते. मात्र, काही वेळेतच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना बुथावरून पांगवण्यात आले. त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीच्या गोटात दाखल, चर्चेत राहिलेले सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत
जिल्हा बँकेत अपयश तरीही वैभव नाईकांचा राणेंना धक्का, समर्थक राजन तेलींचा केला पराभव

संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकेसाठी पोलिसांनी लावलेली फिल्डींग यामुळे कणकवली हे सत्तासंघर्षाचं केंद्र बनलं होतं. त्यामुळे राणेंची साथ सोडणाऱ्या सतिश सावंतांचा निकाल काय लागतो याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती.

या मतदारसंघातील विकास संस्थेमधून विद्यमान बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत विरुद्ध संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई अशी लढत होती. यासाठी एकूण ३६ मतदार होते; मात्र तळेरे संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. ते काल मतदान केंद्रावर पोचू शकले नाहीत. त्यामुळे या मतदारसंघात केवळ ३५ इतकेच मतदान झाले. मजूर सहकारी संस्थेचे संदेश सावंत तसेच एका मंडळाचे मतही त्यांच्याकडे होते. याचबरोबर शिक्षण संस्थेचे मतदार असलेल्या सुरेश शांताराम सावंत हे आजारी असल्याने मुंबईतून मतदानासाठी पोचू शकलेले नव्हते.

राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीच्या गोटात दाखल, चर्चेत राहिलेले सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत
सिंधुदुर्ग: नितेश राणे 2 दिवसांनी फेसबुकवर अॅक्टिव्ह, शेअर केला फोटो; म्हणतात 'गाडलाच..'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in