
Team India Schedule 2023: क्रिकेट क्षेत्रात भारतासाठी (BCCI)2023 हे वर्ष खास ठरणार आहे. यंदा प्रथमच विश्वचषक, आशिया चषक आणि जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामना भारतात खेळला जाणार आहे. भारताला आता पुन्हा एकदा आशिया चषक आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. 2011 नंतर, आयसीसी (ICCI) ओडीआय विश्वचषक पुन्हा एकदा भारतात फक्त 2023 मध्ये खेळला जाईल. ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला (Indian Cricket Team) जिंकण्याची सुवर्णसंधी मिळेल. यासाठी, टीम इंडियाने 2023 मध्ये कोणत्या संघांसोबत कधी आणि कुठे खेळणार याचे वेळापत्रक जारी केलेले आहे. (Schedule Of Indian Cricket Team 2023)
2023 हे वर्ष टीम इंडियासाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. संघाला जागतिक कसोटी स्पर्धेचे विजेतेपदही पटकावण्याची इच्छा आहे. याशिवाय, हे वर्ष संघासाठी २०२४मध्ये होणार्या T20 विश्वचषकासाठी नवीन विचार आणि तयारीने परिपूर्ण असेल.
पहिला आंतरराष्ट्रीय T20- मुंबईत 3 जानेवारी 2023 रोजी होणार
दुसरा आंतरराष्ट्रीय T20- पुण्यात 5 जानेवारी 2023 रोजी होणार
तिसरा T20- राजकोट येथे 7 जानेवारी 2023 रोजी होणार
पहिली वन-डे सीरीज- गुवाहाटी येथे 10 जानेवारी 2023 रोजी होणार
दुसरी वन-डे सीरीज- कोलकाता येथे 12 जानेवारी 2023 रोजी होणार
तिसरी वन-डे सीरीज- तिरुवनंतपुरम येथे 15 जानेवारी 2023 रोजी होणार
पहिली वन-डे सीरीज- हैदराबाद येथे 18 जानेवारी 2023 रोजी होणार
दुसरी वन-डे सीरीज- रायपूर येथे 21 जानेवारी 2023 रोजी होणार
तिसरी वन-डे सीरीज- इंदूर येथे 24 जानेवारी 2023 रोजी होणार
पहिली आंतरराष्ट्रीय T20 सीरीज- रांची येथे येथे 27 जानेवारी 2023 रोजी होणार
दुसरी आंतरराष्ट्रीय T20 सीरीज- लखनौ येथे 29 जानेवारी 2023 रोजी होणार
तिसरी आंतरराष्ट्रीय T20 सीरीज- अहमदाबाद येथे 1 फेब्रुवारी 2023 रोजी होणार
पहिली कसोटी- नागपूर येथे ९ ते १३ फेब्रुवारी 2023 रोजी होणार
दुसरी कसोटी- दिल्ली येथे १७ ते २१ फेब्रुवारी 2023 रोजी होणार
तिसरी कसोटी- धर्मशाला येथे 1 ते ५ मार्च 2023 रोजी होणार
चौथी कसोटी- अहमदाबाद येथे ९ ते १३ मार्च 2023 रोजी होणार
पहिली वन-डे सीरीज- मुंबईत 17 मार्च 2023 रोजी होणार
दुसरी वन-डे सीरीज- विशाखापट्टणम येथे 19 मार्च 2023 रोजी होणार
तिसरी वन-डे सीरीज- चेन्नईत 22 मार्च 2023 रोजी होणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी आणि वन-डे सीरीजनंतर, टीम इंडियाचे सर्व खेळाडू आयपीएल २०२३ च्या आगामी हंगामात व्यस्त असतील. जो एप्रिल ते मे या कालावधीत खेळला जाऊ शकतो. टीम इंडिया सध्या जागतिक कसोटी सामन्याच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत भारत जूनपर्यंत याच स्थानावर राहिला तर जागतिक कसोटी सामन्याचा अंतिम सामनाही खेळताना दिसू शकतो. या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरीजचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. मात्र या सीरीजमध्ये दोन कसोटी सामने, तीन वन-डे सामने आणि तेवढेच टी-२० सामने खेळले जाणार आहेत. आशिया चषक या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा पाकिस्तानला न जाण्यावरून बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये वाद सुरू आहे.
zभारतात होणाऱ्या ICC वन-डे विश्वचषक २०२३ च्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची वन-डे सीरीज खेळणार आहे. या वर्षी भारत प्रथमच संपूर्ण आयसीसी वन-डे विश्वचषक भूषवणार आहे आणि ते पहिल्यांदाच होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळली जाईल. वन-डे विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया वर्षभरात तिसऱ्यांदा भारताविरुद्ध मालिका खेळणार, ज्यामध्ये पाच टी-20 सामन्यांचा समावेश असेल. डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये कसोटी, वन-डे सीरीज आणि टी-२० या तीन सीरीजचा समावेश आहे.