Covid 19: मुंबईकरांना न्यू इयर पार्टी करता येणार नाही, मुंबईत 144 कलम लागू

Covid 19: curfew has been imposed in Mumbai: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
Covid 19: मुंबईकरांना न्यू इयर पार्टी करता येणार नाही, मुंबईत 144 कलम लागू
section 144 imposed in mumbai police prohibit new year celebrations parties in any closed or open space(प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus Omicron in Mumbai: मुंबई: कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटने आता मुंबईकरांची चिंता अधिक वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 2,510 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मुंबईत कलम 144 लागू केले आहे. तसेच मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. यासोबतच नववर्ष साजरे करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तसंस्थेनुसार, प्रशासनाने मुंबईत 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत कलम 144 लागू केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यास बंदी असेल. 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट आणि क्लबमध्ये कोणतीही पार्टी करता येणार नाही.

एकट्या मुंबईत 2510 रूग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाच्या रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये चांगलीच वाढते आहे. मुंबईत दिवसभरात 2510 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 251 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 48 हजार 788 बरे झाले आहेत. मुंबईतील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. असं सगळं असलं तरीही गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या टेन्शन वाढवणारी आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉन संसर्गाचे 85 रूग्ण

आज राज्यात 85 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी 47 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत. एन आय व्ही ने रिपोर्ट केले 47 रुग्णांमध्ये 43 आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि 4 निकटसहवासित आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1306 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 65 लाख 6 हजार 137 रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के झाले आहे. राज्यात मागील 24 तासात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात सध्या 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 14 हजार 65 सक्रिय रूग्ण आहेत. गेल्या आठवड्यापासून आजपर्यंत सक्रिय रूग्णांची संख्याही वाढते आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in