Crime: मुलींची हत्या करणाऱ्या वासनांध सीरियल किलरला अटक

Serial Killer: एक 54 वर्षीय व्यक्तीने तब्बल 4 मुलींची हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
Crime: मुलींची हत्या करणाऱ्या वासनांध सीरियल किलरला अटक
serial killer who killed girls arrested killed 4 in 2 years

फरीदाबाद: फरीदाबादमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या करणारा आरोपी हा एक सीरियल किलर निघाला आहे. याआधीही आरोपीने तीन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलींनी विनयभंगाला विरोध केल्यानंतर आरोपींनी तब्बल चार खून केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. जेणेकरून इतर घटनाही समोर येऊ शकतील.

आरोपी हा सीरियल किलर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 1986 पासून त्याच्यावर सातत्याने तो हत्या करत असल्याचं यावेळी समोर आलं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय आरोपी सिंहराज सिटी हॉस्पिटलमध्ये गार्ड म्हणून काम करत होता. त्याने 31 डिसेंबर रोजी त्याच्या ओळखीच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने विरोध केला असता त्याने तिचा गळा आवळून हत्या केली.

यानंतर आरोपी तरुणीचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. काही पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली, त्यानंतर त्याने काय खुलासा केला, हे जाणून पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सांगितले की, त्याने 31 डिसेंबर रोजी मुलीची हत्या तर केलीच पण त्यापूर्वीही त्याने अनेक मुलीच्या हत्या केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. सिंहराजने 1986 मध्ये छायासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपल्या काका आणि मुलाची हत्या केली होती. याच प्रकरणी त्याला अटकही झाली होती.

डिसेंबर 2019 मध्ये आरोपीने चहाचे दुकान लावणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला आणि मुलीने त्याला विरोध केल्यावर त्याने तिची हत्या केली. हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह आग्र्यातील एका कॅनॉलमध्ये फेकून दिला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये आरोपीने पुन्हा एकदा एका मुलीला आपली शिकार बनवले आणि तिचा गळा आवळून तिची हत्या केल होती. यावेळी देखील त्याने आग्र्यातील त्याच कॅनॉलमध्ये तरुणीचा मृतदेह फेकून दिला होता.

serial killer who killed girls arrested killed 4 in 2 years
डोक्यात दगड घालून तरूणीची हत्या, कराड तालुक्यातली धक्कादायक घटना

ही सगळी समजल्यानंतर पोलिसांना देखील धक्का बसला आहे. त्यामुळे आता पोलीस या आरोपीच कसून चौकशी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in