Amazon वर गांजा विक्रीचा गंभीर आरोप, NCB चौकशीची मागणी

Amazon: सुप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर थेट गांजा विक्रीचा खळबजनक आरोप करण्यात आला आहे.
Amazon वर गांजा विक्रीचा गंभीर आरोप,  NCB चौकशीची मागणी
serious allegations of marijuana sales on amazon cait demands ncb inquiry e shopping website(फाइल फोटो)

मुंबई: सुप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर एक अत्यंत खळबजनक आरोप करण्यात आला आहे. लहान व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेडर्सने (CAIT) ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या अॅपवर गांजा (marijuana) विक्री केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी CAIT ने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)या प्रकरणाचा तात्काळ तपास करावा अशी मागणी केली आहे.

या आरोपावर अॅमेझॉनने म्हटले आहे की, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अमेझॉनचं म्हणणं आहे की, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही बंदी असलेल्या उत्पादनांची लिस्टिंग किंवा विक्री करण्यास परवानगी देत ​​​​नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

मध्य प्रदेश पोलिसांनी भिंडमध्ये ड्रग पॅडलर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट अॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवरून स्टीव्हियाच्या पानांच्या बहाण्याने गांजा विकत असल्याचा आरोप आहे. अॅमेझॉनच्या माध्यमातून काही लोकांनी 390 पॅकेटमध्ये सुमारे 1,000 किलो गांजा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विकल्याचा आरोप आहे. CAIT ने एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणी सूरज पवैया आणि विजेंद्र सिंह तोमर नावाच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांचं म्हणणं काय आहे?

भिंडचे एसपी मनोज कुमार सिंह यांनी याबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांना या ड्रग्ज तस्करांकडून अॅमेझॉनची पाकिटे मिळाली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अॅमेझॉनला देखील नोटीस पाठवली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सखोलपणे केला जाईल.

Amazon ने काय दिलं स्पष्टीकरण?

या संदर्भात अॅमेझॉनच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, हे प्रकरण कंपनीच्या निदर्शनास आले आहे आणि कंपनी स्वतः याची चौकशी करत आहे. प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीने अनुपालनासाठी उच्च मानके सेट केली आहेत आणि amazon.in वर विकल्या जाणार्‍या उत्पादनांसाठी सर्व लागू असलेल्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. आम्ही अशा कोणत्याही वस्तूला किंवा लिस्टिंगला परवानगी देत नाही ज्यांना भारतात कायद्याने बंदी आहे.

serious allegations of marijuana sales on amazon cait demands ncb inquiry e shopping website
Amazon ने का पुढे ढकलला आपला Prime Day Sale?

दरम्यान, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, Amazon हे एक मार्केट प्लेस आहे जे भारतात amazon.in द्वारे थर्ड पार्टी विक्रेत्यांची उत्पादने प्रदर्शित करते आणि या प्लॅटफॉर्मद्वारे संबंधित उत्पादनांची खरेदी-विक्री केली जाते.

त्यामुळे CAIT केलेल्या आरोपानंतर अमेझॉन अडचणीत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(www.businesstoday.in वरील इनपुटवर आधारित)

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in