गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये सापडले कोट्यवधी रुपये, नोटा मोजण्यासाठी बँकांकडून मागवाव्या लागल्या मशीन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डूंगरपूर (राजस्थान): राजस्थानच्या (Rajasthan) डूंगरपूर येथे पोलिसांना गुजरातमध्ये (Gujarat) जाणाऱ्या एका कारमध्ये कोट्यवधील रुपये (Crore Rupees) सापडले आहेत. राजस्थानमधील बिछीवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी शनिवारी नॅशनल हायवे क्रमांक 8 वर मोठी कारवाई करत तब्बल 4.5 कोटींची रोकड जप्त केली आहे. हवालामार्फत या पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं टिप मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी सापळा रचून कोट्यवधींची रक्कम जप्त केली. यावेळी दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून (Delhi) गुजरातमध्ये नेले जात होते. पण सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यावेळी असा दावा करण्यात येत आहे की, हा सगळा पैसा हवालाचा आहे.

DSP मनोज सवारियां यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘सध्या पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशी सुरु करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हवालाशी निगडीत असल्याचं सध्या तरी समजतं आहे. पण अद्यापही पोलीस याबाबत बारकाईने तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ पोलीस ठाण्यात नेलं.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हिंगोलीत मोबाईल चोराला पकडण्यावरुन जमावाची पोलीसांवर दगडफेक

पैशांची मोजदाद करण्यासाठी बँकांकडून मागवाव्या लागल्या मशीन:

ADVERTISEMENT

कारमध्ये सापडलेले पैसे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात होते की, ते मोजण्यासाठी पोलिसांनी पुरेश मशीन नव्हत्या. त्यामुळे हे नेमके किती पैसे आहेत हे मोजण्यासाठी बँकामधून मशीन मागवाव्या लागल्या. दरम्यान, या नोटा मोजण्यात अख्खा दिवस निघून गेला. जप्त करण्यात आलेल्या रुपयांची मोजदाद झाली असून ही रक्कम तब्बल साडेचार कोटी एवढी असल्याचं समजतं आहे. सध्या पोलीस आरोपींना हे पैसे नेमके कुणी दिले याबाबत चौकशी करत आहेत.

ADVERTISEMENT

DL8CA X3573 या कारमध्ये पोलिसांना हे पैस सापडले असून आता पोलिसांनी ही कार देखील आपल्या ताब्यात घेतली आहे. ही कार नेमकी कुणाची आहे याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

धक्कादायक ! भांडण करु नको सांगणाऱ्या वडिलांची १३ वर्षीय मुलाकडून हत्या

राजस्थानच्या बिछीवाडा पोलीस स्टेशन हे गुजरातच्या सीमारेषेजवळ असणाऱ्या रस्त्यावरच आहे. इथूनच नॅशनल हायवे देखील जातो. त्यामुळे इथूनचे अनेकदा तस्करी केली जाते. पण ज्या-ज्या वेळी पोलिसांना त्याविषयी टिप मिळते तेव्हा-तेव्हा पोलीस थेट कारवाई करुन आरोपींच्या मुसक्या आवळतात. आता देखील पोलिसांनी अशाच प्रकारे कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT