Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख 'पठाण' सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता
आर्यनवर झालेल्या कारवाईनंतर त्याची आई गौरी अस्वस्थ असल्याचं कळतंय

Drugs Case मध्ये आर्यनचं नाव, शाहरुख 'पठाण' सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याची शक्यता

शाहरुखच्या आगामी पठाण सिनेमाचं शुटींग स्पेनमध्ये होणार होतं

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर आरोपींवर NCB ने कारवाई केल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. शनिवारी रात्री NCB ने क्रूझवर धाड टाकून ही कारवाई केली, ज्यात आर्यनसह ७-८ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

या प्रकरणी अद्याप शाहरुखकडून अधिकृत प्रतिक्रीया आलेली नसली तरीही मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख आपल्या पठाण या सिनेमाचं स्पेनमधलं शुटींग रद्द करण्याच्या तयारीत आहे.

आर्यानला NCB ने ताब्यात घेतल्यापासून मुंबईतल्या शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर मीडियाने गर्दी केली आहे. शाहरुख दिपीका पदुकोणसोबत एका गाण्याच्या शुटींगसाठी स्पेनला जाणार होता. परंतू आर्यनवर झालेल्या कारवाईनंतर शाहरुख आपलं शुटींग पुढे ढकलू शकतो असं बोललं जातंय.

आर्यनवर झालेल्या कारवाईनंतर त्याची आई गौरी अस्वस्थ असल्याचं कळतंय
Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ला अटक, रेव्ह पार्टीत होता सामील

ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खानचं नाव समोर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आर्यन हा शाहरुखचा मुलगा असला तरीही त्याने आतापर्यंत स्वतःला झगमगाटापासून दूर ठेवलं होतं. कोणत्याही बॉलिवूड पार्टी किंवा अन्य समारंभांमध्ये तो दिसायचा नाही. शाहरुख सध्या NCB अधिकाऱ्यांशी संपर्कात असून सध्या काय घडामोडी घडत आहेत याबद्दल तो माहिती घेतो आहे.

शाहरुखच्या परिवाराशी संबंधित एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख या प्रकरणावर आपली कोणतीही प्रतिक्रीया देईल याची शक्यता कमीच आहे. NCB ने कारवाईसंदर्भातली अधिकृत माहिती दिली की यासंबंधी अनेक कायदेशीर मार्ग आहेत त्यांचा वापर केला जाईल. आर्यनवर झालेल्या कारवाईची बातमी ऐकल्यानंतर त्याची आई गौरी चांगलीच अस्वस्थ झाली आहे.

आर्यनवर झालेल्या कारवाईनंतर त्याची आई गौरी अस्वस्थ असल्याचं कळतंय
क्रूज ड्रग्ज पार्टी : शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही, कठोर शिक्षा झालीच पाहिजे - रामदास आठवले

इंटेरियर डिझाईनच्या एका प्रोजेक्टसाठी गौरीही परदेशी जणार होती, परंतू या परिस्थितीमुळे तिला देखील आपलं काम पुढे ढकलावं लागणार आहे. याचप्रमाणा शाहरुखचंही स्पेनमध्ये पठाण या सिनेमाचं शुटींग होणार होतं. परंतू या कारवाईनंतर आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहता त्याला आपला हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागणार आहे.

आर्यनवर झालेल्या कारवाईनंतर त्याची आई गौरी अस्वस्थ असल्याचं कळतंय
क्रूज ड्रग्स पार्टी: Shah Rukh चा मुलगा Aryan ची चौकशी सुरूच, पाहा काय दिला जबाब

Related Stories

No stories found.