Cruise Drugs Party: ड्रग्स केसमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला मिळणार जामीन?

Aryan Khan Cruise Drugs Party Case: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Cruise Drugs Party: ड्रग्स केसमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला मिळणार जामीन?
shahrukh khan son aryan khan ncb will not seek custody will maybe he get bail

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सापडलेल्या ड्रग्स प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण एनसीबीने म्हटले आहे की, ते आर्यन खानच्या आणखी कोठडीची मागणी करणार नाही. या प्रकरणात अटक झाल्यानंतर आर्यनला रविवारी किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जिथे त्याला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.

'मुंबई तक'ला मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याचे वकील हे जामिनासाठी अर्ज करतील. त्यामुळे आज आर्यनला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, याप्रकरणी कोर्ट नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आर्यन खान व्यतिरिक्त त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना एनसीबी अधिकाऱ्यांनी ड्रगच्या प्रकरणात कथित सहभागासाठी अटक केली होती.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला रविवारी दुपारी 2 वाजता अटक करण्यात आली होती. याआधी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी आर्यनची अनेक तास चौकशी केली होती. आर्यनवर ड्रग्स खरेदी -विक्रीमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

एनसीबीने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "तिन्ही आरोपींना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. इतर पाच आरोपी - नुपूर, इश्मीत सिंह, मोहक जयस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत छोकर यांनाही कोठडी मागण्यासाठी न्यायालयात हजर केले जाईल. या सर्वांना रविवारीही अटक करण्यात आली आहे.

shahrukh khan son aryan khan ncb will not seek custody will maybe he get bail
Cruise Drugs Party: आर्यन खानचा ‘तो’ मित्र अरबाज मर्चंट कोण आहे?, ज्याला सुहानाही करते फॉलो

एनसीबीने गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी मुंबईच्या किनाऱ्यावरील क्रूझवर होत असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आरोपींकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत. त्याचवेळी, एका लेखी निवेदनात, आर्यन खानने आपली अटक स्वीकारताना लिहिले, 'मला माझ्या अटकेची कारणे समजली आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना त्याबद्दल कळवले आहे.'

आर्यन म्हणतो मी तर फक्त 'गेस्ट' म्हणून पार्टीत गेलो होतो

आर्यनने एनसीबीच्या चौकशीत असं म्हटलं आहे की, तो पार्टीमध्ये एक गेस्ट म्हणून गेला होता. आर्यनने एनसीबीला असंही सांगितलं आहे की, पार्टीत सामील होण्यासाठी त्याच्याकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेण्यात आले नव्हते. त्याने असा दावा केला आहे की, पार्टीच्या आयोजकांनी त्याच्या नावाचा वापर करुन पार्टी आयोजित केली. मात्र, असं असलं तरीही आता आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे.

या क्रूझ पार्टीमध्ये दिल्लीतील तीन मुली देखील होत्या. ज्यांना आज (3 ऑक्टोबर) दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं आहे. या तिघीही बड्या उद्योजकांच्या मुली आहेत. दरम्यान, याप्रकरणी एनसीबीने सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. ज्याची तपासणी देखील केली जात आहे.

Related Stories

No stories found.