देवेंद्र फडणवीस यांनी १३ ट्विट केले.. शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनिष जोग, प्रतिनिधी, जळगाव

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. आंबेडकर जयंतीचं निमित्त साधत शरद पवारांच्या विरोधात १३ ट्विट केली. शरद पवार हे कसे जातीयवादी आहेत? त्यांनी इशरत जहाँला कसं निष्पाप ठरवलं होतं. शरद पवारांनी १९९३ ला १२ बॉम्बस्फोट झालेले असताना खोटं सांगून १३ बॉम्बस्फोट झाले असं का सांगितलं? हिंदू दहशतवाद हा शब्द कुणी आणला? या सगळ्यांच्या अनुषंगाने हे ट्विट केले होते. याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला आहे.

‘जातीयवाद ते खोटारडेपणा’ शरद पवारांविरोधात फडणवीसांचे १३ ट्विट

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले शरद पवार?

“मी विरोधी पक्षनेत्याची ट्विट एँजॉय करतो” असं म्हणत शरद पवार यांनी एका वाक्यात विषय संपवला आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत विनोदी आरोप केले आहेत. मी खोटं बोलल्याचं ते म्हणाले तो आरोप तर हास्यास्पद आहे. १३ वा बॉम्बस्फोट झाल्याचं मी सांगितलं हे शंभर टक्के खरं आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा मी त्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी त्यात जे मटेरियल वापरलं गेलं होतं ते कराचीत तयार झालं होतं हे मला माहित होतं. आपल्या शेजारचा देश हिंदू मुस्लिम समाजातलं ऐक्य बिघडवून त्यांना लढवू इच्छितो हे मला लक्षात आलं होतं. त्यामुळे १३ वं ठिकाण मोहम्मद अली रोड हे सांगितलं त्यामुळे जातीय दंगली झाल्या नाहीत हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकत्र आले. हिंदू आणि मुस्लिम ऐक्य रहावं म्हणून ते बोललो. ज्यांना तारतम्य कळत नाही त्यांनी विधानं केली तर त्यांना गांभीर्याने घेऊ नये.

ADVERTISEMENT

शरद पवार जातीयवादीच! आंबेडकर जयंतीच्या दिवशीच देवेंद्र फडणवीसांचा आरोप

आणखी काय म्हणाले शरद पवार?

जातीयवाद माझ्या नावावर टाकला आहे तो कशामुळे टाकला आहे ते काही मला माहित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला आहे त्यावेळी पक्षाचं नेतृत्व कुणाकडे होतं? छगन भुजबळ. त्याच्या नंतरच्या काळात मधुकरराव पिचड यांच्याकडे अध्यक्षपद होतं. त्यानंतर अरूण गुजराथी, त्यानंतर तटकरे. ही सगळी नावं पाहिली तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. आत्ता त्यांच्याकडे दुसरं काही बोलायला नाही त्यामुळे माझ्यावर जातीयवादाचे आरोप करत आहेत.

राज ठाकरे म्हणाले शरद पवार नास्तिक, बारामतीकर म्हणाले हा पाहा व्हीडिओ

केंद्राची सत्ता ज्यांचा हातात आहे ते सत्तेचा गैरवापर करतात याची उदारहरणं दिसत आहेत. जे प्रत्यक्ष सत्तेत नाहीत, प्रशासनात नाहीत त्यांनी काहीतरी आरोप करायचे आणि मग त्यावर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई करायची. ही गोष्ट म्हणजे सरळसरळ मूलभूत अधिकारांवर गडांतर आणलं जातं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंवर भाष्य

राज ठाकरे हे आता हिंदुत्वाच्या मार्गाने जात आहेत. प्रत्येक पक्षाला आपली दिशा ठरवण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे असंही आज शरद पवार जळगावातल्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले आहेत.

देशात दोन राज्यांमध्ये केंद्राच्या एजन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा येत आहेत. त्यांना लोकांनी सत्ता दिली नाही. त्यामुळे अपेक्षाभंग झाला. त्यामुळे चाललेल्या कारभारात हस्तक्षेप कसा करता येईल हे पाहणं चाललं आहे. त्यामुळे छापेमारी आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT