'...तर अजित पवारांनी अर्धवट काम केलं नसतं', पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा खुलासा

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीवर एक मोठा खुलासा केला आहे.
'...तर अजित पवारांनी अर्धवट काम केलं नसतं', पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा खुलासा
sharad pawar big statement on government formation between ajit pawar devendra fadnavis vidhansabha election 2019(फाइल फोटो)

मुंबई: राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जे राजकीय नाट्य घडलं त्याची चर्चा आजही प्रचंड होते. कारण या निवडणुकीच्या निकालाने राज्यातील आणि राजकीय पटलावरील सगळी गणितचं पालटून गेली. या सगळ्या राजकीय डावपेचांमागे सर्वात आघाडीवर होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. त्यांच्याच पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडी सरकारचं सत्तेत आलं. पण या सगळ्यात घडलेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही नेमका घटना कशी घडली याचा आजही कुणालाच थांगपत्ता लागू शकलेला नाही. मात्र, याचबाबत आता खुद्द शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याआधी राज्यातील जनतेत या सरकारबद्दल काहीशी नाराजी होती. तीनही पक्ष फक्त आणि फक्त सत्तेसाठी एकत्र येत आहेत अशी भावना लोकांमध्ये होती. लोकांमधील हीच भावना नाहीशी व्हावी आणि भाजप देखील सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ शकते हे दाखवून देण्यासाठी स्वत: शरद पवार यांनीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले असल्याचं चर्चा आजही आहे. त्याचबाबत शरद पवार यांनी आता सविस्तर खुलासा केला आहे.

शरद पवार यांचा काही दिवसांपूर्वी 81वा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच निमित्ताने 'लोकसत्ता' वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात शरद पवार यांची विशेष मुलाखतही घेण्यात आली. त्यावेळी ते पहाटेच्या शपथविधीबाबत सविस्तरपणे बोलले. 'मी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं असतं, तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं.' असा खुलासा यावेळी शरद पवार यांनी केला आहे.

पाहा शरद पवार नेमकं काय म्हणाले:

राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी यामागे स्वत: शरद पवार हेच होते का? असा सवाल पवारांना मुलाखतीत करण्यात आला. पाहा त्यावेळी शरद पवार यांनी नेमकं काय उत्तर दिलं.

'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 नंतर मी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी सातत्याने चर्चा होते. पण जर हे खरं असतं तर अजित पवार यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. त्यामुळे मी अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं या चर्चेला काही अर्थ नाही.' असं पवार यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in