Sharad Pawar हे विरोधकांचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय आकर्षण-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विरोधकांचे भीष्म पितामह आहेत. तर ममता बॅनर्जी या राष्ट्रीय आकर्षण आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी दिल्लीत केलं आहे. ममता बॅनर्जी यांचा दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत. ममता बॅनर्जींकडे देशातला विरोधी पक्ष फार मोठ्या आशेने पाहतो आहेत. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचीही भेट होणार आहे. भेटीगाठी व्हायला हव्यात. संवाद घडतो, चर्चा होते हे चांगलं लक्षण आहे. ममता बॅनर्जी सोनिया गांधींनाही भेटणार आहेत. विरोधी पक्षांची एकजूट होणं हे काँग्रेसशिवाय अशक्य आहे. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण, आदानप्रदान यासाठी या भेटीगाठी आवश्यक आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींकडे विरोधकांचं नेतृत्व दिलं जाईल असं मी म्हटलेलं नाही. मात्र पश्चिम बंगालची निवडणूक त्यांनी ज्या प्रकारे जिंकली त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रीय आकर्षण म्हणून पाहिलं जातं आहे. शरद पवार हे सध्याच्या घडीला सगळ्या विरोधी पक्षांचे भीष्म पितामाह आहेत. त्यांच्या सल्ल्यानेही अनेक गोष्टी विरोधी पक्षाच्या राजकारणात घडतात. या देशात विरोधी पक्ष जेवढा कमजोर होईल तितका देश आणि देशाची लोकशाही कमकुवत होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज घडीला शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार आहे. मी देखील शरद पवार यांना भेटणार आहे. प्रत्येकजण त्यांना भेटणार आहे. या देशात अनेक असे लोक आहेत जे देशाचं नेतृत्व करू शकतात. ममता बॅनर्जी यांचं एक वलय आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात ज्या प्रकारे काम केलं आहे त्यामुळे त्यांचीही क्षमता देश हाताळण्याची आहे. प्रादेशिक पक्षाचे लोकही दिल्लीत नेतृत्व करताना आपण पाहिलं आहे. या देशामध्ये एकापेक्षा जास्त नेते असू शकत नाहीत का? ते असूच शकतात. एक काळ होता की भाजपमध्ये अनेक मोठे नेते काम करत होते. लालकृष्ण आडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन असे दिग्गज नेते एकाचवेळी काम करत होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हेदेखील आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळत होते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास कुणी करत असेल तर त्यांनी आधी नीट अभ्यास करावा की मी काय बोललो आहे मग उत्तर द्यावं असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुठल्याही गोष्टीवर उठपटांग मत व्यक्त करणं म्हणजे अभ्यास नाही असंही संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जात आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचंही नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जात होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT