मोठी बातमी.. शरद पवारांनी अचानक घेतली PM मोदींची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (6 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची राजधानी दिल्लीत अचानक भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 20 ते 25 मिनटे चर्चा झाली. पण या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

राज्यात सध्या ईडीच्या अनेक कारवाई सुरु आहेत. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांवर ही कारवाई सुरु आहे. त्यातच काल (5 एप्रिल) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांची नरेंद्र मोदींशी काही चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी मारल्या जात आहेत. महाविकास आघाडीकडून या सगळ्याबाबत भाजपवर निशाणा साधला जात आहे. अशावेळी आता मोदी आणि पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत स्वत: शरद पवार यांनी मुंबई Tak सोबत बोलताना माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींशी ‘या’ विषयावर झाली चर्चा

या भेटीबाबत शरद पवार यांनी मुंबई Tak सोबत बोलताना अशी माहिती दिली आहे की, ‘पंतप्रधान मोदींसोबत झालेली भेट ही फक्त ईडीच्या कारवाईंबाबत नव्हती तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, युक्रेन युद्ध, वाढती महागाई तसेच तेलाच्या वाढत्या किंमीत या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली.’ असल्याचं पवारांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

या सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की, खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून कालच जप्त करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे या भेटीवरुन राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता स्वत: शरद पवार राजधानी दिल्लीत दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबत नेमकी माहिती देणार आहेत.

संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. त्यानंतर काल रात्री शरद पवार यांच्या घरी महाराष्ट्रातील आमदारांसाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात देखील संजय राऊत सहभागी झाले होते. याच कार्यक्रमाला भाजप नेते नितीन गडकरी हे देखील हजर होते.

NCB, ED, CBI, IT या तपास यंत्रणांचा मोदी सरकारकडून सातत्याने गैरवापर-शरद पवार

शरद पवार नेमके कशासाठी भेटले असावेत पंतप्रधान मोदींना?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि 100 कोटींच्या वसुलीचा आरोप आहे. या आरोपांवरुन त्यांची ईडी आणि सीबीआय चौकशीही सुरु आहे. आजच अनिल देशमुख यांनी सीबाआयने आर्थर रोड जेलमधून 100 कोटींच्या वसुलीप्रकरणात आपल्या ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक हे देखील तुरुंगात आहेत.

मलिक यांच्या विरोधात दाऊद इब्राहिम आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींशी जमिनीचा व्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

दुसरीकडे शरद पवार यांच्या काही कुटुंबीयांवर देखील ईडी आणि आयकर विभागाने आतापर्यंत कारवाई केली आहे. तसंच ईडीची कारवाई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात देखील सुरु आहे. याच सगळ्या प्रकरणात डॅमेज कंट्रोलसाठी तर आजची भेट झाली नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

याशिवाय राज्य सरकारने देखील ईडीबाबत एक SIT स्थापन केली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे तसेच विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर यांच्याविरोधातही कारवाई सुरु आहे. अशावेळी याच मुद्द्यावर प्रविण दरेकर असं म्हणाले आहेत की, शरद पवार हे डॅमेज कंट्रोलमध्ये निष्णात आहे. पण पंतप्रधान मोदी त्यांच्या बोलण्याला भुलणार नाहीत. त्यांनी जे ठरवलं आहे ते करणारच.

दरम्यान, असं असलं तरीही जेव्हा दोन बड्या नेत्यांची भेट होते तेव्हा त्यावेळी काही तरी नक्कीच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झालेली असते ज्यामुळे नव्या राजकारणाची सुरुवात होण्याची शक्यता असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT