'काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी' शरद पवारांचं भाष्य खरं ठरतंय?

वाचा मुद्देसूद विश्लेषण आणि जाणून घ्या काय घडतंय?
'काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी' शरद पवारांचं भाष्य खरं ठरतंय?

काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं होतं. आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते.‘मुंबई तक’शी पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले होते. हे सगळं खरंच घडतंय असं आत्ताची काँग्रेसची अवस्था पाहून वाटू लागलं आहे.

समुद्र मंथन झाल्यानंतर अमृत आणि विष बाहेर आलं होतं. असंच राजकीय मंथन काँग्रेसमध्येही सुरू आहे असं आत्ताचं चित्र आहे. पंजाबसारख्या राज्यात दोनदा काँग्रेसची सत्ता आली. त्या ठिकाणी आता माजी मुख्यमंत्री विरूद्ध काँग्रेस हायकमांड अशी लढाई सुरू झाली. कॅप्टन अमरिंदर सिंग आता म्हणत आहेत की ते काँग्रेसमधून बाहेर पडणार. ते भाजपमध्ये जाणार नाहीत. मात्र नव्या दिशेने जाणार आहेत.

काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)
काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी. (संग्रहित छायाचित्र)AajTak

छत्तीसगढमध्ये तीच परिस्थिती आहे. भुपेश बघेल म्हणत आहेत माझ्या बाजूने आमदारांचं पाठबळ आहे मला बदलण्याचा प्रय़त्न करू नका. राजस्थानमध्येही अशोक गेहलोत विरूद्ध सचिन पायलट हा संघर्ष सुरू आहेच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो हा की ज्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस एकत्रित राहिली त्या नेतृत्वाचा प्रभाव राहिला आहे का? हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुंबई तकला एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टींबाबत वाच्यता गेली होती ज्याची बरीच चर्चा झाली होती. काँग्रेसची अवस्था रया गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. तसं असेल तर काँग्रेसला रिअॅलिटी चेक करणं आवश्यक आहे का? काँग्रेसला नेतृत्वाबाबत विचार करणं आवश्यक आहे का? हे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे शरद पवारांचं भाकीत खरं ठरतं आहे का हाही प्रश्न आहेच.

राजीव गांधी-संग्रहित फोटो
राजीव गांधी-संग्रहित फोटोसौजन्य-इंडिया टुडे

काँग्रेसने राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव यांचं नेतृत्व पुढे आणलं. सीताराम केसरी यांनी काही काळ नेतृत्व केलं. मात्र काँग्रेसला हे लक्षात आलं की गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही. त्यामुळे याच गरजेतून उदय झाला तो सोनिया गांधी यांचा. त्यानंतरही काँग्रेसमध्ये फूट पडली. मात्र तेव्हाही काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं. ज्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि यशस्वी करून दाखवला. त्याआधी ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. त्या किती यशस्वी ठरल्या आहेत हे आपण नुकतंच पाहिलं आहे अनुभवलं आहे.

काँग्रेसच्या विघटनाला सुरूवात झाली होती. मात्र सोनिया गांधींच्या नेतृत्वात देशभरातला काँग्रेस पक्ष एकत्र राहिला. 2004 ते 2014 या कालावधीत काँग्रेसकडे देशाची सत्ता राहिली. त्याच काळात सोनिया गांधी यांचं वाढतं वय लक्षात घेता 2004 मध्ये राहुल गांधी यांना पक्षात आणण्यात आलं. राहुल गांधी हेच आता पुढे काँग्रेस चालवतील अशी परिस्थितीही त्यावेळी निर्माण करण्यात आली. त्या पद्धतीने सुरूवातीला राहुल गांधी यांना महासचिव केलं गेलं आणि युथ काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांना उपाध्यक्ष बनवण्यात आलं. ज्यामुळे काँग्रेसचे युवराज राहुल गांधीच आहेत हे अधोरेखित झालं.

'काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी' शरद पवारांचं भाष्य खरं ठरतंय?
आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी- शरद पवारांचं परखड भाष्य

2014 नंतर काँग्रेसचं अध्यक्षपदही आलं. 2014 ची निवडणूक भाजपने जिंकली. त्यानंतर 2019 ची लोकसभा निवडणूकही भाजपने जिंकली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं. मधल्या काळात काँग्रेस नेते हेदेखील म्हणत होते की प्रियंका गांधी आता काँग्रेसला तारतील. त्या इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे दिसतात. त्यांची भाषणशैलीही काही प्रमाणात तशी आहे असंही बोललं गेलं. 2017 मध्ये प्रियंका गांधीही राजकारणात सक्रिय झाल्या. उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. तरीही उत्तर प्रदेशमध्ये त्यांचा प्रभाव पडू शकला नाही.

आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की घराणेशाही हीच काँग्रेसची मुख्य समस्या झाली आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, 'पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात नेतृत्वाला काँग्रेस आणि गैर काँग्रेसी लोकांकडूनही मान्यता मिळाली होती. तेच स्थान आजच्या घडीला आहे का ? तर आजच्या स्थितीत फरक पडला आहे अशी स्थिती आहे.' शरद पवारांना यातून हेच सुचवायचं आहे की राजीव गांधींच्या नंतर काँग्रेस पक्षात घराणेशाहीला त्यांच्याप्रमाणे मान्यता मिळाली नाही. शरद पवार पुढे असं म्हणाले की, 'राहुल गांधी यांच्यात क्षमता आहे की नाही हा प्रश्नच नाही. मुद्दा असा आहे की जे स्टेटस संघटनेत लाल बहाद्दुर शास्त्री किंवा इंदिरा गांधी यांचं होतं ते आहे का आज? ती स्थिती आज नाही म्हटल्यावर आपण त्या काळाशी तुलना केली तर वेगळी दिसते.

उपाय काय आहे हे त्या त्या पक्षाला शोधावं लागेल. पण मूळ प्रश्न असा आहे की भाजपला पर्याय काय? गांधी नेहरूंच्या विचाराशी जोडलेले लोक एकत्र आले आणि विश्वास निर्माण करू शकले की आम्ही पर्याय आहोत तर या देशात विचार केला जाईल.' शरद पवारांनी गांधी परिवाराचा नाही तर गांधी-नेहरू असा उल्लेख केला आहे. याचाच अर्थ असा होतो की गांधी परिवाराला वगळून काँग्रेसी विचार जपणारे जे पक्ष आहेत ते एकत्र आले तर मोठी आघाडी तयार होऊ शकते. काँग्रेसला नेतृत्वाबाबत विचार करणं आवश्यक आहे असं त्यांना सुचवायचं होतं.

आत्ताची परिस्थिती काय दिसते तर पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राहुल गांधींच्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी सिद्धू मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण चन्नी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आठच दिवसात सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. हीच परिस्थिती छत्तीसगढमध्ये आहे. अडी वर्षांनी मुख्यमंत्री बदलू असं हायकमांडने त्यांना सांगितलं आहे.

India Today

भुपेश बघेल म्हणाले की माझ्यासोबत 55 आमदार आहेत मला बदललं तर इथेही पंजाबसारखी परिस्थिती निर्माण होईल. तिसऱ्या बाजूला गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल मनिष तिवारी यांच्यासारखे नेते जे G23 म्हणून ओळखले जातात. ते काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून CWC मिटिंग बोलवा. आत्ताच्या परिस्थितीबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे.

कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या घरावर युथ काँग्रेसने मोर्चा नेला. त्यांची कार डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत राहुल गांधी किंवा हायकमांडकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. मात्र काँग्रेसचे इतर नेते यांनी ट्विट करून भूमिका मांडल्या. पी. चिदंबरम, विवेक तनखा यांच्यासारख्या नेत्यांनी टीका केली आहे.

काँग्रेसचे जुने-जाणते नेते CWC ची बैठक बोलवण्याची मागणी करत आहेत. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली जात नाहीये. 1999 मध्ये शरद पवारांनी एक पत्र CWC ला पाठवलं होतं त्यावेळी सोनिया गांधींच्या बाजूने बहुमत होतं. त्यामुळे तारीक अन्वर, शरद पवार, पी. ए. संगमा यांना काढून टाकण्यात आलं. ती परिस्थिती आता राहिलेली नाही हे वास्तव आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in