Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shashikant warishe Murder Case, Ajit Pawar, Devendra Fadnavis : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण विधानसभेत चर्चेला आलं. अजित पवारांनी सभागृहात पंढरीनाथ आंबेरकरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या जाहिरातीच सभागृहात दाखवल्या. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

पंढरीनाथ वारिशे हत्या प्रकरण : विधानसभेत काय झाली चर्चा?

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला. “एसआयटीमार्फत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे, मग वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या स्तरावरील आहे? आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी कधीपर्यंत पूर्ण होणार, दोषींना कधीपर्यंत शिक्षा होणार?”, असे प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एसआयटीची 16 लोकांची टीम काम करत आहे. भारतीय पुरावा कायदा आहे. त्यानुसार पुरावे गोळा करण्यासाठी बाहेरच्या टीम नियुक्त करता येतात. त्यानुसार टीम नियुक्त केल्या आहेत. एसपी आणि आयजी यांचं परिवेक्षण करत आहेत. दोघांचे मोबाईल जप्त झालेले आहेत. त्यांचं फॉरेन्सिक ऑडिट केलं आहे. किती दिवसांत होईल सांगता येणार नाही. लवकरात लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचू.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Bhaskar Jadhav: “शंभर बापाची औलाद नसशील, तर…”, मोहित कंबोज- देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

सुनील प्रभूंनी उपस्थित केला सवाल, फडणवीसांनी काय मांडली भूमिका?

सुनील प्रभू म्हणाले, “महाराष्ट्रात आणखी किती शशिकांत वारिशे होणार आहेत? भविष्यात पत्रकारांवर हल्ले होणार नाही, यासाठी कायदा कडक करता येईल किंवा यापेक्षा वेगळा कायदा करता येईल का? कारण असा कायदा आल्याशिवाय पत्रकारांवरील हल्ले थांबणार नाही.”

ADVERTISEMENT

फडणवीस म्हणाले, “मागच्या काळात आपण पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी कडक कायदा केलेला आहे. या प्रकरणातही त्यातील कलम लावलेली आहेत. अचूक नाही, पण साधारपणे कायदा येण्याआधी 30 गुन्हे पत्रकारांबद्दल नोंदले जायचे. कायदा आल्यापासून ते 10 च्या खाली आहेत. त्यामुळे कायदा परिणामकारक आहे, पण त्याला आणखी कडक करायचं असेल, तर सरकार करेल.”

ADVERTISEMENT

Maharashtra Budget Live: एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना सभागृहात डिवचलं; म्हणाले,…

अजित पवार म्हणाले, हे असे लोक कुणाचेच नसतात; फडणवीस म्हणाले,….

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो. कायदा सुव्यवस्था बिघडणार नसेल, तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. माझा प्रश्न आहे की, शशिकांत वारिशेंच्या कुटुबीयांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आलीये का? काही जाहीर केलेलं आहे का? रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरीचे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू आहे, अशी शंका येते. आपण पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि रिफायनरी संदर्भात तुमची भूमिका काय आहे?”

पंढरीनाथ आंबेरकरने दिलेल्या जाहिराती अजित पवारांनी सभागृहात दाखवल्या. त्यानंतर ते म्हणाले, “ज्याने नीच कृत्य केलं. मी पण सरकारमध्ये काम केलं आहे. तुमच्या वरिष्ठांचे फोटो त्याने लावले आहेत. तुम्ही तपासू एसआयटी लावली आहे, त्यावर अजिबात दबाव येऊ देऊ नका. अशी लोकं कुणाचीच नसतात. आमचं सरकार असतं, तर आमचा उदो उदो केला असता. त्याकरिता स्पष्ट सूचना द्याव्या लागतील. असे फोटो लावल्यामुळे शंका उपस्थित होतो. त्यामुळे तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. मास्टरमाईंड कोण आहे? ते बघितलं तर त्याने जाणीवपूर्वक केल्याचं दिसतंय.”

शशिकांत वारिशे: फडणवीसांचा मोठा निर्णय, राऊतांच्या पत्रानंतर पोलिसांना दिले आदेश

“एसआयटीचा पोलीस उपअधीक्षक आहे. शरद पवारांनी एका प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्याला तपास दिला होता. तशाच पद्धतीने राज्यातील प्रामाणिक अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे. यात राजकीय हस्तक्षेप झाला नाही, तर व्यवस्थित तपास होऊ शकतो. याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. पत्रकारितेला अडचणीत आणणार आहे. दबावाला बळी न पढता सूचना अधिकाऱ्यांना देणार का?”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी 25 लाख रुपये मदत जाहीर केली आणि दिली देखील आहे. जे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. माझं, मुख्यमंत्र्यांचं बॅनर त्याने लावलं होतं. याचा कोणताही दबाव पोलिसांवर नाही. तात्काळ या व्यक्तीला अटक केली. 302 त्यावर लावलं. एसआयटी नेमली आहे. वरिष्ठांना त्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे. आता पोलीस महासंचालकांना सांगेन की त्यांनी स्वतः सगळ्या पोलिसांना सूचना द्याव्यात. या नीच कृत्याप्रकरणी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तपास झाला की, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये घेण्याची विनंती कोर्टाला करणार आहोत. जेणेकरून तात्काळ निकाल लागावा.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT