शशिकांत वारिशे: फडणवीसांचा मोठा निर्णय, राऊतांच्या पत्रानंतर पोलिसांना दिले आदेश

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shashikant Warishe case Home Minister Devendra Fadnavis ordered to constitute SIT: मुंबई: नाणार रिफायनरी (Nanar Refinery) विरोधात बातमी दिल्याच्या अवघ्या 24 तासानंतर पत्रकार शशिकांत वारिशे (Shashikant Warishe) यांचा अपघाती मृत्यू झाला. पण हा अपघात नसून ती हत्या (Murder) असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. याच प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar)याला अटक करण्यात आली आहे. ज्याचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे आरोपही केले जात आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकरणी संशय निर्माण झाला असून राजकीय वातावरण देखील तापलं आहे. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच बोट दाखवत याप्रकरणी गंभीर स्वरुपाचे प्रश्नही उपस्थित केले आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरच देवेंद्र फडणवीस यांनी वारिशे मृत्यू प्रकरणात SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. (shashikant warishe case big decision by devendra fadnavis after sanjay raut sensational letter home minister ordered to constitute sit)

SIT गठीत करण्याचे आदेश

पत्रकार शशिकांत वारिशे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘Fadnavis यांच्या वक्तव्यानंतर वारिशेंची हत्या, योगायोग समजावा का?’ राऊतांच्या पत्राने खळबळ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा 6 फेब्रुवारी 2022 रोजी भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर या रिफायनरी समर्थक व्यक्तीला अटक केली होती. ज्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दुसरीकडे वारिशे यांचा हा अपघात नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती आणि वारिशेंच्या कुटुंबीयांनी केली आहे. ज्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं.

Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?

ADVERTISEMENT

संजय राऊतांचा गंभीर आरोप

याच प्रकरणी शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री फडणवीसांना पत्र लिहून त्यांच्याचविषयी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

4 फेब्रुवारी 2023 रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा का?

आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय? असे गंभीर सवाल करत याप्रकरणी राऊतांनी फडणवीसांवर देखील एक प्रकारे आरोप केले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT