Sheena Bora: ‘शीना बोरा जिवंत आहे’, इंद्राणी मुखर्जीचा दावा… मग रायगडच्या जंगलात सापडलेला मृतदेह कोणाचा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: साधारण सहा वर्षांपूर्वी शीना बोरा हत्याकांड प्रकरण (Sheena Bora Murder Case) हे प्रचंड गाजलं होतं. मात्र, आता या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) हिने आपली मुलगी शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. इंद्राणीने CBI संचालकांना पत्र लिहून आपली मुलगी शीना जिवंत असून ती सध्या काश्मीरमध्ये असल्याचा दावा केला आहे.

जर, समजा.. इंद्राणीचे म्हणणे खरे मानायचे असेल, तर रायगडच्या जंगलातून सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष शीनाचे नव्हते तर मग कोणाचे होते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

इंद्राणी मुखर्जीचे पत्र आणि दावा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात दावा केला आहे की, ती नुकतीच तुरुंगात एका महिलेला भेटली. जिने तिला सांगितले की, ती काश्मीरमध्ये शीना बोराला भेटली होती. त्यामुळे आता सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा. असे इंद्राणीने पत्रात म्हटले आहे. इंद्राणी ही 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात आहे.

रायगडच्या जंगलात पुरण्यात आला होता मृतदेह

ADVERTISEMENT

सीबीआयने आपल्या तपासात खुलासा केला होता की, एप्रिल 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. रायगडमधील पेण परिसरातील जंगलाच्या मध्यभागी तिचा मृतदेह पुरण्यात आला होता. खरं म्हणजे ही गोष्ट कधीही उघड झाली नसती. परंतु 23 मे 2012 रोजी रायगडमधील जंगलात एक मृतदेह पुरल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली. ज्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पेण पोलीस ठाण्यात दिली होती.

ADVERTISEMENT

पोलिसांनी गुन्हाही केला नव्हता दाखल

त्यानंतर पेण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. यावेळी मृतदेहाची चाचणी करण्यात आली. यानंतर काही नमुने घेऊन पोलिसांनी मृतदेह पुन्हा तिथेच पुरला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. पण अचानक तीन वर्षांनी म्हणजे 2015 साली हे प्रकरण अत्यंत धक्कादायक पद्धतीने समोर आलं. कारण ज्या मुलीचा मृत्यू झाला होता ती शीना बोरा ही एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलगी होती. जिचा खून होण्यापूर्वी ती घरातून बेपत्ता झाली होती.

फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये शीनाचा मृतदेह असल्याचेही सांगण्यात आले

रायगडच्या जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष शीना बोराचेच होते. एम्सच्या फॉरेन्सिक अहवालानेही याची पुष्टी केली आहे. हा अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. रायगडच्या जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष हे शीना बोराचेच असल्याचे फॉरेन्सिक अहवालामुळे स्पष्ट झाले होते.

हा अहवाल बनवण्यापूर्वी जंगलात सापडलेल्या मृतदेहाची तीन वेगवेगळ्या प्रकारे चाचणी करण्यात आली होता. त्यानंतरच या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं की, हा मृतदेह शीना बोरा हिचाच होता.

नेमकी कशा प्रकारे करण्यात आली होती मृतदेहाच्या अवशेषांची तपासणी?

तज्ज्ञांनी आधी मृतदेहाच्या हाडांची डीएनए चाचणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कवटीच्या अवशेषांची तपासणी करण्यात आली होती आणि तिसर्‍या टप्प्यात घटनास्थळावरील पुरावे तपासण्यात आले होते.

सर्व नमुने शीना बोराच्या शरीराशी जुळणारे होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शीना बोराच्या शरीरातून घेतलेला डीएनए नमुना. तपासात तो हत्येतील मुख्य आरोपी इंद्राणीच्या डीएनएशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरच तज्ज्ञांनी सविस्तर अहवाल तयार केला होता.

औरंगाबाद: ‘माझ्या डोळ्यासमोर भावाने तिचं मुंडकं तोडलं’, पतीने सांगितलेला किर्तीच्या हत्येचा घटनाक्रम जसाच्या तसा

इंद्राणीच्या दाव्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह?

शीना हत्याकांडातील मुख्य आरोपी आता तुरुंगात असलेल्या शीनाची आई इंद्राणी मुखर्जीने जो दावा केला आहे त्या दाव्यानुसार तिने एक प्रकारे सीबीआय आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व यंत्रणांचा तपासाबाबत संशय व्यक्त केला आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, इंद्राणीच्या दाव्यात जर तथ्य असेल तर रायगडच्या जंगलातून ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता तो नेमका कोणाचा? त्याला मुलीला कोणी मारलं होतं? त्या मुलीच्या हत्येमागचा हेतू काय होता? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हत्येचं प्रमुख सूत्रधार कोण होतं? असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे सीबीआयला नव्याने शोधावी लागू शकतात..

    follow whatsapp

    ADVERTISEMENT