Shiv Sena dussehra Melava: मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडली, दसरा मेळाव्याच्या भाषणातील 20 महत्त्वाचे मुद्दे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण भाषणातील 20 मुद्दे आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. पाहा यावेळी मुख्यमंत्री नेमकं काय-काय म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 20 मुद्दे:

1. शिवसेनेचा आवाज दाबणारा कुणी जन्माला येऊ शकत नाही. 1966 पासून शिवसेनेची आभिमानास्पद वाटचाल. शिवसैनिक हे शस्त्र.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2. मी मुख्यमंत्री आहे असे वाटू नये, मी तर तुमच्या कुटुंबातील सदस्य आहे. पद येतील सत्ता येईल जाईल. अहमपणा डोक्यात जाऊ देऊ नकोस हा संस्कार. आशिर्वाद हीच माझी ताकद

3. माझे भाषण संपल्याची काही जण वाट बघताहेत. चिरकायची सवय ही राजकारणात अलिकडे विकृती. त्यांना ती रोजगार हमी.

ADVERTISEMENT

4. हर्षवर्धन पाटील बोलले भाजपात का गेलो? अशी लोक भाजपाची ब्रँड अँबेसेडर. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही आले तर सोडत नाही. ईडी सीबीआयच्या माध्यामातून येऊ नका. समोरासमोर या हे मर्दाचे हिंदुत्वाचे लक्षण नाही. बंगालसारखे लढण्याची तयारी दाखवा.

ADVERTISEMENT

5. हिंदुत्व आता धोक्यात इंग्रजांची निती वापरून भेद केला जातो. शिवसेनाप्रमुखांचा मराठी म्हणून एकत्र या. मराठी अमराठी भेद होऊ देऊ नका. मराठा तितुका मेळवावा हिंदुत्व वाढवावा.

6. आपले आणि RSS चे विचार एकच मार्ग वेगळे. शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर तुम्ही पण मुख्यमंत्री राहिला असता. शिवसेनाप्रमुखांचे वचन म्हणून जबाबदारी घेतली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेलच. हे माझे क्षेत्र नाही. झोली वगैरे कर्मदरिद्री विचार आपले नाही.

7. आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? हे मोहनजींना जनतेला मान्य आहे का? सत्तेसाठी संघर्ष नको- भागवत, सध्या जे काही सुरू आहे तुमच्या लोकांची शिकवणी लावा.

8. सत्तेचे व्यसन हा अंमली पदार्थ आहे. अनेक प्रयत्न सरकार पाडण्याचे झाले दोन वर्षात. छापा टाकून काटा काढायचा हे प्रकार जास्त चालू शकणार नाही. देशाचा अमृत महोत्सव. महाराष्ट्र, पंजाब, बंगाल त्यावेळी समोर. ममतांचे आजच्या संघर्षासाठी अभिनंदन.

9. 92-93 साली शिवसेना होती म्हणून तुम्ही आहात. केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले हिंदुत्वाला धोका नाही. आजच्या सत्ताधीशांमुळे हिंदुत्व धोक्यात आहे. सावरकर, गांधी कधी वाचलेत का? जर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा फक्त एकमेव हिंदुह्दयसम्राट उभे होते. शिवसेनाप्रमुखांनी बाबरी पाडल्यावर सुध्दा ‘गर्व से कहो हम हिंदू है’ म्हणाले. बाकीचे थरथरत होते.

10. तुमची पालखी वाहत नाही म्हणून आरोप करता. आम्ही हिंदुत्वाचे, भारतमातेचे भोई आहे. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली. आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर षंढपणा आहे. दोन्ही पोटनिवडणुकीत जगातल्या मोठा पक्षाकडे उपरे उमेदवार.

11. राज्यपालांनी पत्र लिहिले. आम्हाला माता भगिनींचा सन्मान आमच्यात आहे. बलात्कार करणाऱ्याला फासावर लटकवल्या शिवाय स्वस्थ नाही. राज्यपालांना दिलेल्या उत्तराचे समर्थन. कायदा कडक शासन सगळं करतोहोत.

12. देशात घडू नये यासाठी काय करणार मोदींना अधिवेशन घ्यायला सांगितले. महाराष्ट्रात काही घडले की गळे काढायचे. उत्तर प्रदेशात काय सुरु आहे. 26 नोव्हेंबर ज्यांनी बलिदान केले त्या खात्याला माफिया म्हणणे चूक.

13. काहींच्या घरी 24 तास शिमगा. उत्तरप्रदेशाचे पोलीस काय भारतरत्न आहेत? महाराष्ट्र सत्तेला नव्हे सत्याला जगणारा आहे. सावरकर, गांधी चिरकूट वाद घालणाऱ्यांनी देशासाठी काय केले?

14. आंदोलन स्वातंत्र्य काळात योगदान नाही. तुम्ही 75 वर्षात देशात काय केले. नुसती रोषणाई करायची? या वर्षी काही बाबतीत उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे.

15. महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक. बाबासाहेबांनी केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले गेले. आणिबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी बंद करावे.

‘तुम्ही मुख्यमंत्री राहिला असता… पण तुमच्या नशिबात नव्हतं’, फडणवीसांवर मुख्यमंत्र्यांचा थेट वार!

16. जगात फक्त महाराष्ट्रात गांजा, चरसचा व्यापार सुरु आहे. असे एक चित्र उभे करायचे. मुंद्रा, अदानी बंदर कुठे येते? दहा ग्रॅम शोधणारे यांनी लक्षात घ्यावे. महाराष्ट्रात दीडशे कोटींचे ड्रग्स पोलिसांनी जप्त केले.

17. आपल्या देशात युवा शक्ती मोठी. त्यांच्या रिकाम्या हाताला काम नाही. तरुण गुन्ह्याकडे का वळतोय? व्यवस्थित ही शक्ती घडवावी लागेल नुसत सत्ता हवी म्हणून होणार नाही अगोदर चूल पेटवा. चीन मधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करु नका.

18. मराठी भाषा भवन उभे राहणार. संभाजीनगरला संतपीठ. मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालन, मत्सालय, लष्कराचे संग्राहलय उभे करणार.

19. लढाई न बघितल्याने स्वातंत्र्याबाबत विस्मरण. सैनिक विपरित हवामानात पहारे देतात. दालनात सैनिक पहारा देतात ते वातावरण अनुभवायला मिळेल. लढ्यात सहभागी नव्हता निदान संग्राहलयात तरी सहभागी व्हा.

20. हिंदुत्व आता खरे धोक्यात. म्हणून बंगालप्रमाणे तुमची तयारी आहे? मराठी-अमराठी भेद करु नका. मराठी म्हणून एक व्हा मराठा तितुका मेळवावा प्रमाणे हिंदुत्वसुध्दा वाढवा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT