'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात', राऊतांचा PM मोदींवर निशाणा

Sanjay Raut: नागपुरात संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
shiv sena leader sanjay raut criticized pm modi over ed cbi income tax action
shiv sena leader sanjay raut criticized pm modi over ed cbi income tax action(फाइल फोटो)

योगेश पांडे, नागपूर: 'एक पुतीन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत. ईडीच्या माध्यमातून हे मिसाईल सोडले जात आहेत. पण तरीही आम्ही डगमगलो नाही.' असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. लोकमत या वृत्त समूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागपुरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

'कालपर्यंत आम्हाला वाटत होतं की ही वेगळीच गडबड आहे. पण आपण सिद्धार्थजींसारख्या तज्ज्ञांला आपण बोलावलं आणि रशिया-युक्रेन यांच्या युद्धातील सत्य त्यांच्या भाषणातून आपल्याला समजलं. आपल्या देशात युद्ध नसेल पण आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत असतात.'

'दिल्लीमध्ये पुतिन बसलेले आहेत आणि आमच्यावर मिसाईल सोडतायेत. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल... बॉम्ब सोडतायेत, मिसाईल सोडतायेत.. त्यातून आम्ही वाचलेलो आहोत. रोज एक मिसाईल येतं आम्ही ते वाचवतो.'

'कारण महाराष्ट्रावर अशाप्रकारचे हल्ले करणं.. कोणत्याही राज्यामध्ये.. ज्या राज्यामध्ये आपलं सरकार नाही त्या राज्यांशी अधिक सन्मानाने वागलं पाहिजे हे आम्हाला पंडित नेहरुंकडून शिकायला मिळालं.' अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

shiv sena leader sanjay raut criticized pm modi over ed cbi income tax action
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो सोमय्यांनी आणला समोर

कारवाईचा फास आवळला जाणार?

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाटणकर यांच्या नावावर असलेले ११ फ्लॅट ईडीने सील केले आहेत.

या चौकशीदरम्यान पाटणकर यांच्या फर्म्सना नंदकिशोर चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरकडून Unsecure Loan मिळाल्याचं ईडीला समजलं आहे. त्यामुळे चतुर्वेदीविरुद्ध ईडीने कारवाईचा फास आवळण्याचं ठरवलं आहे. ईडी येणाऱ्या काही दिवसांत चतुर्वेदीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जाहीर करण्यासाठी पावलं उचलणार असल्याचं कळतंय.

नंदकिशोर चतुर्वेदी हा देशातला सर्वात मोठा हवाला ऑपरेटर म्हणून ओळखला जातो. देशातल्या अनेक राजकीय नेत्यांशी याचे जवळचे संबंध असल्याचंही बोललं जातं. अनेक प्रकरणांमध्ये चतुर्वेदी हा ईडीसह अन्य यंत्रणांच्या रडारवर आहे. परंतू अनेकदा प्रयत्न करुनही तो त्यांच्या हाती लागलेला नाही.

दरम्यान, ईडीने येणाऱ्या काही दिवसांमध्ये श्रीधर पाटणकर यांच्या आणखी काही मालमत्ता जप्त करण्याची तयारी केल्याचं कळतंय. येणाऱ्या काळात पाटणकर यांना ईडी चौकशीसाठी बोलावू शकतं, या चौकशीनंतर पुढील कारवाईचा मार्ग स्पष्ट होणार असल्याची माहिती ईडीमधील सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in