'एखादा शूटर लावून मला मारून टाका'; शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर निशाणा

'पातळी सोडून बोलू नका, अन्यथा मीसुद्धा पातळी सोडेन' : जळगाव जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध खडसे राजकारण तापलं
'एखादा शूटर लावून मला मारून टाका'; शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर निशाणा
जळगाव जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध खडसे संघर्ष...

भाजपतून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतरही जळगाव जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध एकनाथ खडसे संघर्ष संपला नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एका व्हायरल ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर नामोल्लेख टाळत निशाणा साधला. त्याला आता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज (१ ऑक्टोबर) बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. खडसे यांनी केलेल्या टीकेला आता पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. खडसे मी युती तोडण्याल्याचं अहंकाराने आजही सांगतात. सध्या एकनाथ खडसे यांचं डोकं ठिकाणावर नसून, पक्ष बदलल्यानंतर देखील खडसे यांना अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं, तर कधी पळावं लागतं, अशी परिस्थिती आहे,' असं पाटील म्हणाले.

'हे सगळं असताना तीन-तीन वेळा त्यांना कोविड झाला. त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे', असा टोला शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

'एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात पातळी सोडून बोलू नये. एकनाथ खडसे यांनी पातळी सोडल्यास, मी देखील पातळी सोडून बोलेल. मी एकनाथ खडसे यांचा कधीही अनादर केलेला नाही. मात्र एकनाथ खडसे यांनी तोंडाला कुलूप लावावं', अशी टीका त्यांनी केली.

'व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत असून, खडसेंनी ही क्लिप मतदार संघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी. जेणेकरून कुणाची काय पात्राता आहे, हे मतदारांना कळेल. मी व माझे कुटुंब अत्यंत साधेपणानं जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल, तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावं. माझं छोटं कुटुंब असून, माझ्या बाजूनं बोलणारं कुणीही नाही. आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो ही स्थिती आहे', असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.