'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा'  शिवसेना आमदार राजन साळवींना धमकीचा फोन

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा'  शिवसेना आमदार राजन साळवींना धमकीचा फोन

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार राजन साळवी यांना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  'रिफायनरी का काम मत रोकना , बुरा हो जाएगा , चल फोन रख' , असे सांगत आमदार राजन साळवींना धमकी दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा'  शिवसेना आमदार राजन साळवींना धमकीचा फोन
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नंबर वापरून पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरला खंडणीसाठी धमकी

रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेना स्थानिकांच्या बाजूने या प्रकल्पाच्या विरोधात ठामपणे उभी आहे. आमदार राजन साळवी हे देखील या प्रकल्पाच्या विरोधात सुरुवातीपासून स्थानिकांच्या बरोबर आहेत. आमदार राजन साळवी हे राजापूरचे शिवसेनेचे आमदार म्हणून 2009 सालापासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे .

धमकीचा फोन केव्हा आला ?

आमदार राजन साळवी यांना 10 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7. 30 वाजता 9265440576 या क्रमांकावरुन पहिला फोन आला. अज्ञाताने 'रिफायनरी का काम मत रोकना , बुरा हो जाएगा , चल फोन रख ' एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर 11 जानेवारी 2022 रात्री 11. 14 वाजता परत फोन करुन धमकी दिली. ‘रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे ' अशी धमकी देण्यात आली. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे.

आमदार साळवी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या धमकीची दखल घेऊन एनसी दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी - मंत्री उदय सामंत

आमदार राजन साळवी ना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राजन साळवी कडवे शिवसैनिक आहेत, अश्या फुसक्या धमक्यांना घाबरणारे नाहीत. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत, ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करणार आहे, असं ट्विट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in