'सईद खान यांनी बनावट कागदपत्रांचा उपयोग करून पब्लिक ट्रस्टचं रूपांतर कंपन्यांमध्ये केलं'

कोर्टात ईडीचा दावा, सईद खान यांना 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी
'सईद खान यांनी बनावट कागदपत्रांचा उपयोग करून पब्लिक ट्रस्टचं रूपांतर कंपन्यांमध्ये केलं'
सईद खान आणि भावना गवळी फोटो-इंडिया टुडे

शिवसेना खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने अटक केली. त्यांना 1 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत धाडण्यात आलं आहे. अशात बनावट कागदपत्रांचा उपयोग करून सईद खान यांनी पब्लिक ट्रस्टचं रूपांतर कंपन्यांमध्ये केलं असा दावा आता ईडीने कोर्टात केला आहे.

ED तर्फे अॅडव्होकेट हितेन वेनेगावकर यांनी न्यायालयाला हे सांगितलं की सईद खान यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे एका कंपनीत रूपांतर केलं आहे. या कंपनीचे सर्वाधिकार दोघांकडेच असतील असा या मागचा मुख्य उद्देश होता. शालिनीताई गवळी आणि भावना गवळी अशा दोघींकडे हे अधिकार आहे. पैशांच्या लेयरिंगसाठी हा बद करण्याचा आला होता. ज्यानंतर यामध्ये पैशांची अफरातफर करण्यात आली.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (MUP) हे बीएमएमस आणि आयुर्वेदिक महाविद्यालय चालवते. या संस्थेने आत्तापर्यंत 5 हजार मुलांना शिक्षण सवलत देऊन शिकवलं आहे. यासंबंधीचा हा व्यवहार आहे.

वेनेगावकर यांनी न्यायालयाला असंही सांगितलं की या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रोख हस्तांतरण झाले आहे. वेनेगावकर यांच्या मते आरोपी सईद खान यांनी कंपनीच्या निर्मितीसाठी कागदपत्रे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बँकेचे एनओसी आणि ट्रस्टच्या बोर्ड सदस्यांनी स्वाक्षरी केलेली प्रतिज्ञापत्रे आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून आणलेली एनओसी तसंच बँक एनोसी हे सगळं बनावट होतं असंही वेनेगावकर यांनी न्यायालयाला सांगितलं. वेनेगावकर यांनी हेदेखील सांगितलं की खान यांना सगळं स्पष्टीकरण देण्याची एक संधी दिली होती. मात्र मला जे निर्देश दिले त्याप्रमाणे मी वागलो, माझ्याकडे इतर कोणतीही माहिती नाही. असंच उत्तर सईद खान यांनी दिलं त्यामुळे आता त्यांची ईडीच्या कोठडीत रवानगी करणं आवश्यक आहे असंही न्यायालयाला सांगितलं. ज्यानंतर न्यायालयाने 1 ऑक्टोबर पर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे.

सईद खान आणि भावना गवळी
Exclusive : ED च्या रडारवर भावना गवळी, Bhavna Agro कंपनीचं गौडबंगाल काय?

कोण आहेत सईद खान

सईद खान हे मुळचे परभणीच्या पाथरी शहरातले रहिवासी. येथील आठवडी बाजार परिसरात त्यांचं घर आहे. सईद खान यांचा पहिले चहा-पाण्याचं हॉटेल, ट्रान्सपोर्ट असा व्यवसाय होता. कल्पना ट्रान्सपोर्ट आणि कल्पना हॉटेल या नावाने त्यांनी सुरुवातीला व्यवसाय केला. सईद खान यांची दोन लग्न झाली असून त्यांची पहिली सासुरवाड जिंतूर तर दुसरी सासुरवाड परभणी शहरातील मुमताज कॉलनी मधली आहे.

सईद खान यांची दोन लग्न झाली असून त्यांची पहिली सासुरवाड जिंतूर तर दुसरी सासुरवाड परभणी शहरातील मुमताज कॉलनी मधली आहे. पहिल्या लग्नापासून सईद खान यांना एक मुलगा तर दुसऱ्या लग्नातून दोन मुली आहेत. भावना गवळी यांच्या व्यवसायाशी असलेल्या संबंधाव्यतिरीक्त सईद खान यांची राजकीय पार्श्वभूमीही आहे. विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात.

सर्वसाधारण कुटुंबातून वर आलेल्या सईद खान यांनी काही काळातच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी झेप घेतली. सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन क्षेत्रात ते काही काळ ठेकेदार म्हणूनही काम करत होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना हा पार्टिकल बोर्ड चे पार्ट तयार करण्यासाठी निर्मिण्यात आला. हा कारखाना वाशिमच्या शिरोडमध्ये आहे.

हा कारखाना 1992 मध्ये पुंडलिक रामजी गवळी यांनी सुरू केला. पुंडलिक गवळी हे भावना गवळी यांचे वडील आहेत. भावना गवळी या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. या फॅक्टरीला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थातत NCDC ने भांडवल दिलं. तसंच राज्य सरकारनेही मिळून यामध्ये 55 कोटींची गुंतवणूक आहे.

इतकं सगळं होऊनही आश्चर्याची बाब ही आहे की हा कारखाना कधी सुरूच झालाच नाही. या कारखान्यात कुठलंही उत्पादन न होता हा कारखाना तोट्यात गेला असं दाखवण्यात आलं आहे.

या कारखान्यासाठी जे साहित्य मागवण्यात आलं त्याचे दर डोळे विस्फारणारे आहेत. खासरून बाहेरून आयात करण्यात आलेल्या मशीनच्या किंमती या कोड्यात टाकणाऱ्या आहेत.

या कारखान्यावर झालेला सगळ्यात आलेला आरोप हा आहे की या कंपनीचं बाजारमूल्य हे 55 कोटी असताना या कारखान्याचं अवमूल्यांकन करण्यात आलं आहे. 7 कोटी 9 लाख 90 हजार इतकं कमी मूल्य या कारखान्याचं दाखवण्यात आलं. हे अवमूल्यांकन पुण्यातील MITCON कंपनीने केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in