'बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना हिंदूंचे ओवेसी व्हायची घाई', राज ठाकरेंवर बोचरी टीका

Shiv Sena sharp criticism on Raj Thackeray: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज ठाकरेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे.
shiv sena sharp criticism of Raj Thackeray from the Saamana editorial hindu owaisi bjp loudspeaker
shiv sena sharp criticism of Raj Thackeray from the Saamana editorial hindu owaisi bjp loudspeaker

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका स्वीकाराली आहे. त्यामुळेच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा घेत त्याबाबत सध्या रान उठवलं आहे. मात्र, त्यांच्या याच भूमिकेवरुन शिवसेनेकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. आज देखील शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राज ठाकरेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

'बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदूंचे असदुद्दीन ओवेसी व्हायची घाई झाली आहे. ही इतकी घाई बरी नाही हे त्यांना सांगायचे कोणी? या दोन्ही ओवेसींना भारतीय जनता पक्षाने मांडीवर घेतले असून 2024 च्या निवडणुकांची तयारी त्या माध्यमातून सुरू केली आहे.' अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

 • देशातील जातीय आणि धार्मिक वातावरण बिघडवून व लोकांना कायद्याचे उल्लंघन करायला लावून पुढारीपणाचा कंडू शमविणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, अशा पोरखेळांनी व प्रायोजित कार्यक्रमांनी कोणाला हिंदूंचे सम्राट वगैरे होता येणार नाही.

 • महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत व केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मूक दर्शक बनून पाहत आहे.

 • चांगल्या राज्यकर्त्याचे हे लक्षण नाही. ब्रिटिशांनी ‘फोडा, झोडा व राज्य करा’ याच नीतीचा अवलंब केला. देशी राज्यकर्त्यांना राज्य करण्यासाठी त्याच नीतीचा अवलंब करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायाच गेली. दुसरे काय म्हणायचे!

 • शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट होते, पण ते धर्मांध नव्हते. एकदा त्यांनी स्पष्टच सांगितले, ‘‘मला हिंदूंना जागे करायचे आहे, पण मला हिंदूंचा खोमेनी व्हायचे नाही.’’

 • बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना मात्र हिंदूंचे असदुद्दीन ओवेसी व्हायची घाई झाली आहे. ही इतकी घाई बरी नाही हे त्यांना सांगायचे कोणी? या दोन्ही ओवेसींना भारतीय जनता पक्षाने मांडीवर घेतले असून 2024 च्या निवडणुकांची तयारी त्या माध्यमातून सुरू केली आहे.

 • तयारी म्हणजे काय? तर देशाचे वातावरण साफ बिघडवून टाकायचे. काँगेस राजवटीत दंगली होत असल्याचा ठपका सतत ठेवला जात होता, पण मोदी राज्यात रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने दंगली घडविल्या जात आहेत त्याचे काय?

shiv sena sharp criticism of Raj Thackeray from the Saamana editorial hindu owaisi bjp loudspeaker
Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे
 • दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाली व त्यानंतर दंगल उसळली.

 • आता म्हणे जामा मशीद परिसरातून मोठा शस्त्रसाठा पकडल्याची बातमी आली. देशभरात दंगलींचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने कोविड संकटातून आताच कोठे बाहेर पडणाऱ्या लोकांना नव्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल.

 • महाराष्ट्रात भोंगे लावण्यावरून नवहिंदू ओवेसींनी जो वाद निर्माण केला, त्या भोंग्यांवरून देशातील महाभयंकर महागाई व बेरोजगारीचे आकडेही जाहीर झाले पाहिजेत. महागाई व बेरोजगारीचा आक्रोश दडपण्यासाठी ‘भोंगे’ वाजविण्याची शक्कल सुचलेली दिसते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in