Uddhav Thackeray : हो… मला तुमची साथ हवी आहे, ठाकरेंची उत्तर भारतीयांना साद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shivsena | Uddhav Thackeray News :

मुंबई : मला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं कोणतंही एक वाक्य किंवा एक शब्द काढून दाखवा, ज्यात ते म्हणाले आहेत, आपण हिंदू आहोत म्हणजे फक्त मराठीच आहोत. हिंदी भाषिक लोकांचा द्वेष करा. आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एक आहोत, म्हणून मुस्लिम लोकांचा द्वेष करा, ते असं कधीही म्हणाले नाही. आम्ही हिंदू-मुस्लीम आणि मराठी-अमराठी असा भेद कधीही केला नाही. राष्ट्रीयत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. मला ताकाला जाऊन भांडं लपवायची सवयं नाही. मला तुमची साथ हवी आहे, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील उत्तर भारतीयांना संबोधित केलं. ते आज गोरेगाव येथे आयोजित उत्तर भारतीय मेळाव्यात बोलतं होते. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray addressed North Indians in Mumbai)

भाजप म्हणजे हिंदुत्व नाही :

हिंदुत्व हा समान धागा असल्याने आम्ही ३० वर्षे राजकीय मैत्री निभावली. आता त्यांना गरज नसल्याने त्यांनी शिवसेना, अकाली दल अशा पक्षांना सोडलं. आता आम्ही युती तोडली. पण तेव्हाही आम्ही हिंदू होतो. आजही आम्ही हिंदू आहोत आणि उद्याही राहू. आम्ही भाजपला सोडलं, मात्र, आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. ते जे आज हिंदुत्व चालवत आहेत, ते मी मानायला तयार नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

IPS Rashmi Shukla यांना बढती; फोन टॅपिंगमुळे अडकल्या होत्या वादात

मोदींनी त्यांच्या किचनमध्ये जाऊन पोळ्या शेकल्या तर त्यांचं हृदय विशाल आहे :

जर मी काँग्रेसोबत गेलो तर हिंदुत्व सोडल्याची टीका झाली. आता तुमच्यासोबत बोलत आहे तर उत्तर भारतीयांच्या मागे लागलो म्हटलं. पण परवा मोदीजी त्यांची पोळी भाजून गेले. कोणाच्या किचनमध्ये? जर मी हे केलं असतं तर हिंदुत्व सोडलं म्हटलं असतं. माझा त्या समाजाला विरोध नाही. बोहरा समाजाचे लोकही आमच्यासोबत आहेत. पण मोदींनी त्यांच्या किचनमध्ये जाऊन पोळ्या शेकल्या तर त्यांचं हृदय विशाल आहे, असं कसं? असं म्हणतं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली.

ADVERTISEMENT

राज्यपालांचा समाचार :

आज चांगला मुहूर्त आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यासाठी उत्तरेतून गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतीयांमध्ये आलो आहोत. शिवाय छत्रपती शिवाजी जयंतीपूर्वी त्यांचा अपमान करणारं पार्सल परत जात आहे, हा योगायोग आहे, असं म्हणतं ठाकरे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

Bhagat Singh Koshyari : कोश्यारींचा राजीनामा मंजूर, बैस नवे राज्यपाल

आजच्या पंतप्रधानांना माझ्या वडिलांनी वाचवलं :

शिवसेना आणि भाजपची जेव्हा युती झाली, तेव्हा आम्हाला वाळीत टाकल्यासारखं वातावरण होतं. कोणीही आम्हाला साथ देण्यास तयार नव्हतं. हात मिळवणं तर सोडा शेजारी येऊन बसण्याचीही कोणी हिंमत करत नव्हतं. कारण काय तर हे सांप्रदायिक आहेत, असं म्हणायचे.

ठाकरे पुढे म्हणाले, जेव्हा वाईट दिवस होते, तेव्हा माझ्या वडिलांनी आजच्या पंतप्रधानांना वाचवलं होतं. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. ते म्हणाले होते, राजधर्माचं पालन केलचं पाहिजे. जर त्यांनी राजधर्माचं पालन केलं असतं, तर आज तिथं बसले नसते. त्यावेळी बाळासाहेबांनी पर्वा केली नाही. त्यावेळी ती काळाची गरज होती, असं म्हणतं, उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या अडचणीच्या काळात शिवसेनेनं मदत केल्याची आठवण करुन दिली.

हिंमत असते, तोच हिंदू असतो :

यावेळी ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये हिंमत नसल्याची टीका केली. ते म्हणाले, शिंदे गट आणि भाजप यांच्यात हिंमत नाही, हे नेहमी दिसून आले आहे. आता त्यांना मी पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मग त्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा असो की लोकसभा कोणत्याही निवडणुका घ्या. मात्र, ती हिंमत त्यांच्यात नाही. हिंमत नाही आणि ते स्वतःला हिंदूचे नेते म्हणवतात. हिंमत असते, तोच हिंदू असतो, असेही ते म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT