"शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे...."

मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत संजय राऊत यांचं वक्तव्य
"शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे...."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुढीपाडव्याला केलेल्या भाषणापासून आणि त्यानंतर झालेल्या सभेपासून चांगलेच चर्चेत आहेत. तसंच आणखी एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे राज ठाकरे यांनी जी हिंदुत्वाची वाट धरली आहे त्यामुळे शिवसेनेची कोंडी होणार का? हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनेही सुरूवातीपासून लावून धरला होता. अशात राज ठाकरेंवर टीकाही केली जाते आहे. या सगळ्याबाबत मुंबई तकला सविस्तर मुलाखत दिली आहे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी.

शिवसेना खासदार संजय राऊत.
शिवसेना खासदार संजय राऊत.संग्रहित छायाचित्र/पीटीआय

आमचं हिंदुत्वच ओरिजनल हिंदुत्व आहे. बाकी सगळे भ्रष्ट नक्कल करत आहेत. ओरिजनल कागद ओरिजनल असतो. भ्रष्ट नक्कल करण्याला काय अर्थ आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

"शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे...."
राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय?

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दाही उचलला होता. आता हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. हे म्हणजे असं झालं की धोतरं संपत नाहीत म्हणून साड्यांचं दुकान काढायचं, साड्या संपत नाहीत म्हणून लहान मुलांचे कपडे विकायचे, ते चाललं नाही म्हणून चपला विकायच्या. गाळा तोच पण पर्याय वेगवेगळे काढायचे असं कसं काय चालेल? राज ठाकरेंनी आत्तापर्यंत कितीवेळा भूमिका बदलल्या? हे आपण पाहिलंच आहे असंही संजय राऊत म्हणाले. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने सुरू केला आणि आम्ही आजही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे
राज ठाकरे(फोटो सौजन्य - ट्विटर)

राज ठाकरेंनी भोंग्यावरून अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्यावर पर्याय काढून, मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन सरकारकडून भोंग्याचा मुद्दा संपवण्याचा प्रयत्न होतो आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, "भोंग्यांचा मुद्दा फार गंभीर नाही. महाराष्ट्रात तर मुळीच नाही. मशिदीवरचे भोंगे आणि रस्त्यावरचे नमाज हा शिवसेनेने काढलेला विषय होता. बाळासाहेब ठाकरेंनी उघडपणे याविरोधात भूमिका घेतली होती. आमची सत्ता आली तर नमाज बंद करू असं वचन बाळासाहेब ठाकरेंनी दिलं होतं. त्यांनी आकांडतांडव केलं नाही. त्यांनी मुस्लिम नेत्यांना बोलावलं आणि पर्याय काय असू शकतात विचारले. मुस्लिम नेत्यांचं म्हणणं हे होतं की मशिदी लहान असल्याने आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. मशिदीच्या जागा वाढवण्यासाठी एफएसआय वाढवून देण्याची मागणी केली. ती मागणी मुख्यमंत्र्यांना सांगून पूर्ण करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावरचे नमाज बंद करण्यात आले.

"शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे...."
भाड्याने हिंदुत्व घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, संजय राऊत यांना राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे आज तीच भूमिका घेत आहेत हा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, "राज ठाकरे नक्कल करत आहेत. आम्ही ओरिजनल आहोत.. तुम्ही त्यांची आणि आमची तुलना करू नका. जे आहे ते आहे. आम्ही कुणाचा पाठलाग करत नाही. आम्ही दुसऱ्याने तयार केलेल्या मार्गावरून चालत हा आमचा रस्ता असं सांगत नाही. भोंग्यांचा विषय महत्त्वाचा नाही. आता शिवतीर्थावरही सभा होत असत. डेसिबलचा मुद्दा तेव्हाही समोर आला होता. आमच्यावर गुन्हे दाखल झाले होता. धार्मिक विषय नाही हे राज ठाकरेही म्हणत आहेत. पण याबाबत गृहमंत्री काय तो निर्णय घेतील."

विलेपार्लेची पोट निवडणूक होती तेव्हा शिवसेनेने दाखवून दिलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मिळतात. भाजप शिवसेनेची युतीही याच मुद्द्यावर झाली होती. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हाच मुद्दा होता याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "तेव्हा देशात सत्तेवर असणारे राज्यकर्ते वेगळ्या विचारांचे होते. आज प्रखर हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांचं राज्य आहे. मोदी, अमित शाह हे राष्ट्रीय स्तरावरची हिंदुत्वाची प्रतीकं आहेत. गुजरातच्या दंगलीतून मोदींचं नेतृत्व पुढे आलं हे कसं काय विसरून चालेल?"

"शिवसेनेचं हिंदुत्वच ओरिजनल, बाकी सगळे...."
भाजपसाठी राज ठाकरे महाराष्ट्राचे ओवेसी-संजय राऊत

आम्ही(शिवसेना) हिंदुत्वाचा मुद्दा उचलला होता तेव्हा सत्ता काँग्रेसची सत्ता होती. आता हिंदुत्ववाद्यांचं राज्य असताना तुम्ही (राज ठाकरे ) जे करत आहात ते भाजपचं अपयश वाटतं. कारण तुम्हीच कुणाला तरी पुढे करून हिंदुत्वाविषयीचे मुद्दे पुढे करत आहात. हा राजकीय विषय आहे. राष्ट्रीय स्तरावर कायदा का झाला नाही? गोवंश हत्यासंदर्भात जसा निर्णय घेतला तसा हिंदुत्वाच्या बाबत का घेतला नाही? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.

सध्या देशात असं वातावरण आहे की भाजपच्या ट्रॅपमध्ये मीडिया अडकतोय. १० राज्यांमध्ये दंगली झाल्या त्यावर कुणीही काहीही का बोलत नाही? रामनवमी आणि हनुमान जयंतीला दंगली ऐकल्या आहेत का? यावर्षी त्या झाल्या. कारण या सगळ्यांना देशातलं वातावरण बिघडावयचं आहे. देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे. इतर अनेक समस्या आहेत. त्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून धर्म नावाची अफूची गोळी दिली जाते आहे.

महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्दा आम्ही घेतला होता. पण आम्ही विकासाचंही राजकारण केलं. हिंदुत्व ही आमची संस्कृती आणि विचारधारा आहे. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी आहोत पण कधीही बिगर हिंदूंचा निषेध आम्ही करत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे आजचं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या मनात ते कायमच होतं. बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला होता तरीही हिंदुत्वाचा कोपराही त्यांच्या मनात कायम होता. शिवसेनेने मागच्या ३५ वर्षांपासून हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडला नाही. पण धार्मिक विद्वेष आम्ही निर्माण केला नाही. ज्या पद्धतीने आज मुस्लिमांना टार्गेट केलं जातं आहे ते आम्ही केलं नाही.

आत्ता जे वातावरण देशात आहे त्यामुळे आपण एका विशिष्ट समाजाला फाळणीच्या दिशेने ढकलतो आहोत. हे कसं घडेल याचे विशेष प्रयत्न राज्यकर्ते करत आहेत. राज्यकर्त्यांच्या भूमिकांमुळे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचं प्रचंड नुकसान होणार आहे. आम्ही दोन्ही बाजूंनी पाहिलं आहे की ९२-९३ ला काय घडलं?

माणूस जगण्यासाठी किडुकमिडुक काहीतरी करत असतो. कायद्याचं राज्य आहे..कोल्हापूरमध्ये मोठी यंत्रणा उभी केली होती... मात्र तिथे त्यांना यश आलं नाही. निवडणुकांमध्ये मतं वाढतात, कमी होतात. पण ९७ हजार मतं विजयी उमेदवाराला पडली आहेत. आम्ही यशाकडे पाहतो. कोल्हापूरला पुढच्या वेळी कोण लढणार हे ठरेल. शिवसेनेचा त्या जागेवर दावा असणार आहे. आम्ही तिघे एकत्र लढणार आहोत हे नक्की आहे. यावेळी परिस्थिती वेगळी होती.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत फोटो सौजन्य-ट्विटर

ईडीची कारवाई थंडावली असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, माझ्याविरोधात ईडीकडे काहीही नाही. माझ्यावरच्या रोषापोटी कुणाला तरी सूडाच्या राजकारणात आनंद वाटत असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही मला अटक करा. शरद पवार मोदींना भेटले तेव्हा त्यांनाही वाटलं की हे जे चाललं आहे ते अन्याय आहे.

शरद पवार यांचं जे काही प्रेम माझ्यावर आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझ्याशी सूडाच्या भावनेतून कारवाई सुरू आहे हे देशभरातल्या राष्ट्रीय नेत्यांनी त्या दिवशी मला फोन करून सांगितलं. शरद पवार आणि माझं एक वेगळं नातं आहे. ही कारवाई चुकीची आहे हे त्यांच्या लक्षात आलं. महाविकास आघाडीची बाजू मी कायम मांडत आलो आहे. केंद्र सरकार, तपास यंत्रणा ज्या प्रकारे काम करत आहेत ते शरद पवार यांना माहित आहे. संजय राऊतच पवारांना जवळचे नाहीत तर पण मोदीही त्यांना जवळचे आहेत. मोदींनी तर बारामतीत सांगितलं आहे की मी पवारांना गुरू मानतो.

राज ठाकरेंच्या औरंगाबादला होणाऱ्या सभेबाबत विचारलं असता राऊत म्हणाले की, औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा MIM चा उमेदवार निवडून आणायचं आहे. ओवेसीला मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने ठेवलं आहे. नव्या ओवसींच्या मदतीने हिंदू मतं म्हणजे आम्हाला मिळणारी मतं फोडण्यासाठी ठेवलं आहे. पण लक्षात ठेवा शेवटी ओरिजनल ते ओरिजनल असतं. असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरेंचा समाचार आमच्या मुलाखतीत घेतला आहे.

Related Stories

No stories found.