जुन्या मित्राला सोबत घेऊन शिवसेनेने शिकवला काँग्रेसला धडा, यवतमाळमध्ये सेना-भाजपची युती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तिन्ही पक्षातील महत्वाचे नेते हे वारंवार आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं बोलत असतात. परंतू राज्याच्या अनेक भागांमध्ये तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झालेलं पहायला मिळत नाहीये. आतापर्यंत पुणे, रायगड अशा ठिकाणी महाविकास आघाडीतले वाद प्रामुख्याने समोर आले, यात आता भर पडली आहे ती विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्याची.

स्थानिक नगरपंचायतीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला जुना मित्र भाजपला सोबत घेऊन काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, मारेगाव, महागाव आणि झरी या नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असून राळेगाव आणि कळंब या नगरपंचायती काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मारेगाव नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता येण्याची फक्त औपचारिकता बाकी असताना शिवसेनेने काँग्रेसला धोबीपछाड देत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे उमेदवार डॉ. मनिष तुळशीराम मस्की हे मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ८ विरुद्ध ७ मतांनी शिवसेनेने काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांचा पराभव केला.

या विजयात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करुन हा विजय मिळवला आहे. त्यातच काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मतदानाला अनुपस्थित राहून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या मदत केली. दुसरीकडे झरी नगरपंचायतीत शिवसेनेने स्थानिक जंगोम दलासोबत युती करत नगराध्यक्षपद आपल्याकडे राखलं आहे. याव्यतिरीक्त महागाव नगरपंचायतीत शिवसेनेने थेट भाजपला सोबत घेऊन नगराध्यक्ष पद मिळवलं. काँग्रेसने स्थानिक राजकारणात शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करुन बेईमानी केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT