BMC निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार? संजय राऊतांचे संकेत

'भाजपला हरवण्यासाठी काँग्रेस सोबत काही जागांवर समजुतीने तोडगा काढावा लागेल'
BMC निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार? संजय राऊतांचे संकेत
संजय राऊत, खासदार शिवसेना फोटो-आज तक

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एकत्र असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळा रस्ता पकडण्याचं ठरवलंय. शिवसेनेनेही आगामी BMC निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी काही दिवसांपुर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना महापालिकेत शिवसेना १०० पेक्षा जास्त जागा मिळवून बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलं.

"मुंबई महापालिकेत आम्ही आमच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. १०० पेक्षा जास्त जागा मिळवून महापालिकेत बहुमत मिळवण्याकडे आमचा कल असेल. महाविकास आघाडी तर असेलच पण शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून १०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. मुंबई हे शिवसेनेचं जन्मस्थान आहे आणि BMC वर आमचीच सत्ता असेल", अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली.

"मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. गेल्या दशकभरापासून शिवसेना मुंबईत २०० जागा लढवते आहे. मुंबईत काँग्रेसचंही काही भागांमध्ये चांगलं वर्चस्व असल्यामुळे ते प्रत्येक निवडणुकीत किमान ८० ते १०० जागा लढतात, त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष ८० पेक्षा कमी जागा लढणार नाही. याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसलाही थोड्या जागा द्यावा लागतील."

त्यामुळे शिवसेनेचा असा विचार आहे की आम्ही १५० जागा लढवल्या तर बहुमतासाठी लागणाऱ्या ११४ जागांपर्यंत पोहचलणं कठीण होईल. त्यामुळे अशावेळी युती करण्याऐवजी भाजपला हरवण्यासाठी काही जागांवर काँग्रेससशी सामोपचाराने तोडगा काढता येऊ शकतो, असंही राऊत म्हणाले. याआधी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता.

Related Stories

No stories found.