राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला देत होते, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट - Mumbai Tak - shivsena minister anil parab gave unofficial lists for transfer of police officers anil deshmukh to ed - MumbaiTAK
बातम्या

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला देत होते, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या चार्जशीटमध्ये हा जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्याबाबत केलेल्या या गौप्यस्फोटामुळे आता परब यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. ईडीने तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट […]

राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते असा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी ईडीला दिलेल्या चार्जशीटमध्ये हा जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल देशमुख यांनी अनिल परब यांच्याबाबत केलेल्या या गौप्यस्फोटामुळे आता परब यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

ईडीने तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट मंत्र्याने बदल्यांसंदर्भातली यादी दिली होती असं म्हटलं आहे. याबाबत अनिल देशमुख यांना विचारलं असता ती यादी आपल्याकडे अनिल परब द्यायचे असं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांनी मला यादी दिली होती आणि तिच यादी त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख-सचिन वाझे कनेक्शनबद्दल ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?

बदल्यांच्या संदर्भात गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावं बाहेर काढा असंही तत्कालीन सचिवांना सांगितलं होतं असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. अनिल परब हे तुम्हाला यादी देत होते तर मग ते यादी कुठून आणायचे? असं विचारला असता देशमुख म्हणाले की कदाचित शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे. आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावं अनिल परब यांच्याकडे देत होते आणि ती यादी तयार झाल्यानंतर माझ्याकडे अनिल परब देत असत असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत आहेत – काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा आरोप

अनिल देशमुख यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. त्यातला मुख्य आरोप होता तो म्हणजे सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा. तर दुसरा आरोप होता तो म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या यामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. हे सगळं प्रकरण कोर्टासमोर आल्यानंतर आणि हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद सोडावंही लागलं.

2 नोव्हेंबरला अनिल देशमुख ईडी समोर हजर झाले त्यानंतर त्यांची चौकशी करून उशिरा त्यांना अटक करण्यात आली. आता त्यांनी आपल्या जबाबात बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता पुढे काय काय घडणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 − one =

रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण…