...तर पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचा- भास्कर जाधवांनी राणांना फटकारलं

कोण हा फडतूस रवी राणा, बाळासाहेबांनी तुला कधीच शिवसैनिक केलं नसतं - भास्कर जाधव
...तर पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचा- भास्कर जाधवांनी राणांना फटकारलं

उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठनावरुन झालेल्या वादात पोलिसांनी अटक केलेल्या नवनीत आणि रवी राणा यांना न्यायालयाने 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शनिवारी शिवसैनीक आणि राणा दाम्पत्यामध्ये मोठा संघर्ष पहायला मिळाला. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राणा दाम्पत्याला चांगलंच फटकारलं आहे.

"कोण हा फडतूस रवी राणा? कुठे होता? मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणे... बाळासाहेबांनी तुझ्यासारख्या फडतूस माणसाला कधीच शिवसैनिक केलं नसतं. हनुमान चालीसा वाचून जर देशाची परिस्थिती सुधारणार असेल तर राणा यांनी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर चाऊन चालीसा वाचावी म्हणजे त्यांनी कबूल केलेले 15-15 लाख लोकांना मिळतील", अशा शब्दांत भास्कर जाधवांनी राणा यांच्यावर टीका केली आहे.

...तर पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचा- भास्कर जाधवांनी राणांना फटकारलं
झुंडशाहीचं असं राज्य कधीच पाहिलं नाही, आम्ही जशास तसं उत्तर देऊ-फडणवीस

रवी राणा हे भाजपचे समर्थक आहेत. त्यांनी शिवसेनेची काळजी करु नये. बाळासाहेबांच्या मनात काय आहे किंवा होतं हे तुझ्यासारख्या फडतूस माणसाने सांगण्याची गरज नाही असंही भास्कर जाधव म्हणाले.

...तर पंतप्रधान मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाचा- भास्कर जाधवांनी राणांना फटकारलं
उद्धव ठाकरे आणि संजय पांडेंना माझा मनसुख हिरेन करायचा; सोमय्याचा गंभीर आरोप

राणा दाम्पत्याला झालेल्या अटकेनंतर राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा नवीन संघर्ष पहायला मिळाला. राणा दाम्पत्याची भेट घ्यायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर उपस्थित शिवसैनिकांनी दगडफेक करत हल्ला केला, ज्यात सोमय्यांना दुखापतही झाली. यावर बोलत असताना भास्कर जाधव यांनी, प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी सोमय्यांनीच हा हल्ला करवून घेतला असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे.

"किरीट सोमय्यांवर दगडहल्ला झाला की त्यांनी तो करवून घेतला हा संशोधनाचा विषय आहे. रात्री साडेनऊ-दहा वाजता ते पोलीस स्टेशनला का गेले होते, काय काम होतं त्यांचं? नियमाप्रमाणे आरोपीचे वकील आणि नातेवाईक त्यांना भेटायला जाऊ शकतात. तुमचं आणि राणा दाम्पत्याचं नातं काय हे महाराष्ट्रासमोर स्पष्टपण येऊ द्या. देशाचे पंतप्रधान आज महाराष्ट्रात येत असताना त्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलंय, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे", असा संशय भास्कर जाधवांनी बोलून दाखवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in