'आम्हाला कोणी विचारत नाही, भाजपच्या पाठींब्याने आमदार झालो', शिवसेना आमदाराने व्यक्त केली खदखद

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटलांचा पक्षाला घरचा आहेर
'आम्हाला कोणी विचारत नाही, भाजपच्या पाठींब्याने आमदार झालो', शिवसेना आमदाराने व्यक्त केली खदखद

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं खरं, परंतू खालच्या पातळीवर ही युती अद्याप घट्ट झालेली दिसल नाही. विशेषकरुन शिवसेना नेते आणि आमदारांना डावललं जाण्याच्या अनेक बातम्या मध्यंतरी प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यात भर पडली आहे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांची.

या सरकारमध्ये आम्हाला कोणीही विचारत नाही, मी भाजपच्या पाठींब्याने आमदार झाल्याचं सांगत आमची अवस्था घरची कोंबडी डाळ बराबर झाल्याची खदखद शहाजीबापू पाटील यांनी भर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

"राज्यातील मंत्रीमंडळात माढा लोकसभा मतदार संघातील एकही मंत्री नाही. आमच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात घेतलं नाही. माझं सोडा शिवसेनेतून मी पहिल्यांदाच निवडून आलोय. त्यामुळे मला आधीच गडबड करायची नाही, लांब बसायचं म्हणून सांगण्यात आलंय. पण ३०-३० वर्ष निवडून आलेल्या बबनदादा शिंदे सारख्या लोकांनाही संधी देण्यात येत नाही. आम्हाला नाही वाटत या सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारतंय, घरची कोंबडी दाळ बरोबर अशी आम्हा सगळ्यांची अवस्था झालीय. गप्प बसायचं नाहीतर गावाकडे जायचं, एवढंच उरलंय,” असं म्हणत शहाजी पाटलांनी पक्षाला घरचा आहेर दिला.

'आम्हाला कोणी विचारत नाही, भाजपच्या पाठींब्याने आमदार झालो', शिवसेना आमदाराने व्यक्त केली खदखद
...या बातम्या खोट्या आहेत, आदित्य ठाकरेंना द्यावं लागलं स्पष्टीकरण

यावेळी बोलत असताना शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या सांगोला तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी भाजपाच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो, असा गौप्यस्फोट केला. खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपाचे माझ्यावर सतत लक्ष होते. अडचण आहे का,अ सं विचारायला त्यांचे फोन यायचे असेही त्यांनी सांगितले. तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना भाजपासोबतच राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाला, असं ते म्हणाले. तर या महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचा कोणी विचार करेल असे वाटत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

'आम्हाला कोणी विचारत नाही, भाजपच्या पाठींब्याने आमदार झालो', शिवसेना आमदाराने व्यक्त केली खदखद
जुन्नर: महाविकास आघाडीतला वाद शमेना, रस्त्यावरच भिडले आजी-माजी आमदार

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in