किरीट सोमय्या केंद्रीय यंत्रणांचे दलाल, नाव न घेता प्रताप सरनाईकांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओवळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजकारणात एक खळबळ उडवून दिली आहे. या पत्रात सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजपशी युती करण्याचा सल्ला दिला आहे. या पत्रात सरनाईक यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सरनाईक यांच्याविरोधात ईडी चौकशी सुरु आहे.

Pratap Sarnaik Letter: ‘भाजपशी जुळवून घ्या, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करत आहे’ प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब

“कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल आणि शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही आळा बसेल. आम्हाला टार्गेट केलं जात असताना आमच्या कुटुंबावरही आघात होत आहेत. एका केसमधून जामिन मिळाला की दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे असे प्रकार तपास यंत्रणा करत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल.” असं सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपलं काम पाहून सत्तेत राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्ष फोडण्याचं काम करत असतील आणि त्यामुळे आपला पक्ष कमकुवत होणार असेल तर आपण पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेलं बरं राहील असं माझं वैयक्तिक मत आहे असं सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हणलंय. आपल्या अनेक आमदारांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची काम झटपट होतात पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची काम होत नाहीत अशी नाराजी काही आमदारांमध्ये आहे. भाजपची युती मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठं करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे का अशी चर्चा सुरु असल्याचंही सरनाईक यांनी म्हटलंय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर प्रतिक्रीया दिली आहे. “सरनाईक यांना आता जेलचे दरवाजे दिसायला लागले आहेत. सीबीआय, ईडी वर ते आरोप करत आहेत. NSCL-MMRDA चे घोटाळे सरनाईकांनी केले. सरनाईकांना जेलमध्ये जावच लागेल, अनिल परबांचीही हीच अवस्था होणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी बांधलेलं रिसॉर्टही तुटेल आणि परब जेलमध्ये जातील. उद्धव ठाकरेंच्या माफीया सेनेची दयनीय अवस्था झालेली आहे. घोटाळे करताना तुम्हाला तपाय यंत्रणांची आठवण आली नव्हती का?”, असा प्रश्न सोमय्यांनी सरनाईकांना विचारला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT