'यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? आम्ही एकच...' संजय राऊत यांनी सुनावले खडे बोल

जाणून घ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसफोटो-इंडिया टुडे

यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? ते बघावं लागेल आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू खाटकन असा इशारा आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. महाराष्ट्रात इतकं नीच आणि हलकट पातळीचं राजकारण कधीही झालं नव्हतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहोत का? उलट तुमचेच संबंध आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य त्यांनी केलं आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राईव्हच्या माध्यामातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आज संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी हे उत्तर दिलं आहे. गुरूवारी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका नव्या पेनड्राईव्हचा उल्लेख केला. त्यावर आता आम्ही एकच कव्हरड्राईव्ह मारू असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
Encounter फेम इसाक बागवान यांची संपत्ती ते मलिकांचा राजीनामा व्हाया बारामती, फडणवीस विधानसभेत सुसाट...

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

एक तक्रार माझ्याकडे आली. या तक्रारीचं पेनड्राईव्ह पण माझ्याकडे आहे. हा पेनड्राईव्ह केवळ गृहमंत्र्यांना देणार आहे. यासाठी नाही की, माननीय अध्यक्षांनी आक्षेप घेतला की, तुम्ही इकडे पेनड्राईव्ह देतात आणि तिकडे मीडियाला देतात. पण तो आमचा अधिकारच आहे. बोलण्याच्या आधीही देण्याचा अधिकार आहे. पण हा एवढ्याकरिता मी आपल्याला देणार आहे कारण की, मी अजून याचं फॉरेन्सिक ऑडिट केलेलं नाही.'

'त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्टीचं जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत मी कोणावरही आरोप लावत नाही. पण आपल्याला कल्पना आहे की, मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त ACP आहेत इसाक बागवान म्हणून. सेलिब्रेटेड आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट होते त्यांना काही पुरस्कार वगैरे पण मिळालेले आहेत. पण आता त्यांच्या बंधूंनी त्यांची तक्रार केलेली आहे. आणि दादा.. त्यांचं बारामती कनेक्शन आहे. हा तुमच्याशी कनेक्शन नाहीए.' असं म्हणत त्यांनी विविध आरोप केले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
...तर शिवसैनिकाच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल, संजय राऊत यांचा खोचक टोला

आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?

केंद्रीय तपासयंत्रणा आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते यांची हातमिळवणी सुरू आहे. त्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातलं सरकार यांना चालू द्यायचं नाही. त्यांना हे सरकार खोट्या प्रकरणांमधून उद्ध्वस्त करायचं आहे. याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं चाललंय. एकदा ज्यांना तुरुंगात पाठवायचं आहे त्यांची यादी तयार करा. केंद्रीय तपास यंत्रणांना सांगा की 25 लोकांना तुरुंगात टाकायचं आहे. आम्हाला आधी तुरुंगात टाका आणि मग आरोप करा काही हरकत नाही. तुमचा महाराष्ट्रद्रोही आत्मा शांत करा, असंही राऊत यांनी सुनावलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in