आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रालाही दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचा भगवा फडकला तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं असं वक्तव्य आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज संजय राऊत यांनी कंगना रणौत आणि विक्रम गोखले यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. शेतकरी मालक नाही तर गुलाम करण्याचे कायदे सरकारने आणले होते. शेतकऱ्यांच्या जमिनींवर कब्जा करणारा कायदा होता. सरकारने दडपशाही केली पण शेतकरी हटला नाही. एक वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी आंदोलन करत होता आणि तणाव सहन करत होता. त्या जोखडातून शेतकरी बाहेर निघाला आहे कारण कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. 1947 मध्ये चलेजाव चळवळ झाली. त्यामुळे ब्रिटिश सरकार निघून गेलं. तसंच जनता रस्त्यावर आली असती कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कृषी कायदे मागे घेतले गेले असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर नाशिक महापालिकेत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडणूक येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे मात्र कंगना आणि विक्रम गोखलेंना ते वाटावंच असं काही नाही असाही टोला त्यांनी लगावला.

ADVERTISEMENT

‘कंगना रणौत किंवा विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही’

ADVERTISEMENT

‘2014 नंतर खरं स्वातंत्र्य मिळाले असे काही जणांना वाटते, तशीच स्वातंत्र्याची पहाट ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने उगवल्याचे मलाही वाटते. दीड वर्षांपासून शेतकरी ज्या तणावाखाली, दबावाखाली आणि दहशतीखाली होता ते दहशतीचे जोखड निघाले आहे, असे मला वाटते.’

‘स्वातंत्र्य म्हणजे काय असते? कंगना रणौत किंवा विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही, तुमच्या मनावरची जोखड जेव्हा निघून जाते, फेकले जाते ते स्वातंत्र्य असते, मग राज्यकर्ते कोणीही असो.’ असंही राऊत यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT