'भाजप सुडाचं महाभारत करतं आहे पण त्यात शेवटी कौरवांचा नाश झाला हे त्यांनी विसरू नये'

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला सुनावले खडे बोल
'भाजप सुडाचं महाभारत करतं आहे पण त्यात शेवटी कौरवांचा नाश झाला हे त्यांनी विसरू नये'
संजय राऊतइंडिया टुडे

केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील नेत्यांच्या मागे लागल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारमधले नेते हे ED, IT, CBI, NCB च्या रडारवर आहेत. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, 'भाजपने सुडाच्या महाभारताला सुरूवात केली आहे पण त्यांनी हे विसरू नये की महाभारतात शेवटी कौरवांचा नाश झाला' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही. आम्ही जी भूमिका घेतली होती ती भाजपने मान्य न केल्याने हे घडलं. त्यानंतर आम्ही जी भूमिका घेतली ती त्यांना मान्य झाली नाही. त्यामुळे आता केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा त्यातल्या मंत्र्यांना त्रास देण्याचा डाव सुरू आहे. भाजपकडून हे सुडाचं महाभारत केलं जातं आहे. मात्र महाभारतात नाश झाला तो कौरवांचा हे त्यांनी विसरू नये.'

शिवसेनेचे नेतेे संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.
शिवसेनेचे नेतेे संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.Twitter

शिवसेना दादरा नगर हवेलीची पोटनिवडणूक लढतो आहोत. आम्ही त्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात येतो आहे. इतके दिवस आम्ही भाजपला मदत करत होतो त्यामुळे आम्ही राष्ट्रीय पातळीवर वाढलो नाही. त्याचा फटका आम्हाला चांगलाच बसला आहे असं संजय राऊत यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. गोव्यातही आम्ही लढतो आहोत. शिवसेनेला आणि काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग तिथे आहेत.

कसा होणार दसरा मेळावा?

दसरा मेळाव्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. यावर्षीचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होणार नाही तो षण्मुखानंद सभागृहात होणार आहेत. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना नियमांच्या बाबतीत काटेकोरपणे पाळतात आणि आम्हाला पाळायला लावतात. आम्ही शिव तीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उत्सुक होतो पण उद्धव ठाकरे यांनी नाही असं सांगितलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकांपर्यंत अनेक माध्यमातून हा मेळावा पोहचणार आहे. विरोधी पक्ष गेलं वर्षभर अनेक खोटीनाटी प्रकरणं उभी करून महाराष्ट्र, शिवसेनेला आणि महाविकास आघडीला बदनाम करत आहेत. उद्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे या सगळ्याची परतफेड करतील. त्यांना कळेल की शिवसेना काय आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ओढून ताणून आम्ही निशाण्यावर कुणाला आणत नाही. आमच्या मेळाव्याला कुणी आखाडा म्हणेल, व्यासपीठ म्हणत असेल सव्याज परतफेड करण्यासाठी हा मेळावा घेतला जातो आहे. देशाला दिशा देणारा हा मेळावा असतो.

संजय राऊत
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर 'या' ठिकाणी होणार

देशातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर

देशात शेतकऱ्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शांततापूर्ण निषेध करणाऱ्यांना चिरडलं जातं आहे. ही बाब धक्कादायक आहे. देशात लोकशाही आहे हे सांगावं लागतंय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. या सगळ्याला दसऱा मेळाव्यात उत्तरं दिली जाणार आहेत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तपास यंत्रणांचा, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्यांच्या जावयाला कशा प्रकारे अडकवलं. हे सगळं चित्र चांगलं नाही. एखाद्या कुटुंबाची बदनामी, छळ केल्यानंतर त्याची भरपाई कोण करणार? एका कुटुंबाच्या मानसिक नुकसानीची भरपाई कोण करणार?

संजय राऊत
'मला वाटत नाही की महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत' वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांचं वक्तव्य

वीर सावरकरांची भाजपकडून बदनामी

वीर सावरकर यांनी माफी मागितली हे भाजपनेच जाहीर केलं. वीर सावरकरांनी कधीच माफी मागितली नाही हे आम्ही कायम सांगितलं आहे. त्यावेळी आमच्यासोबत भाजपही होतं. मात्र आता वीर सावरकरांनी गांधींच्या सल्ल्याने माफी मागितली असा एक नवा शोध भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी लावला आहे. भाजपने सावरकरांची बदनामी सुरू केली आहे का? असाच प्रश्न मला पडतो असंही संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.