'दुसऱ्यांना उखडता उखडता एक दिवस....' शिवसेनेने नड्डा, मोदींना सुनावले खडे बोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.

'दुसऱ्यांना उखडता उखडता एक दिवस....' शिवसेनेने नड्डा, मोदींना सुनावले खडे बोल

सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेल्या घोषणेचा समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजप नेते-पदाधिकाऱ्यांना दिले. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?, असा सवाल विचारत जरा जपून बोलण्याचा सल्ला राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून!

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अत्यंत राष्ट्रहिताचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, महागाईविरोधी असे विचार ठणकावून व्यक्त केले म्हणजे काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब त्यांनी फेकला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका,

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत.
भाजपचे नेते उठसुट तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात, तुरुंगाचे खासगीकरण झालं आहे का?-संजय राऊत

भाजप जनतेचा विश्वास जिंकेल, असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नक्की काय घडेल याविषयी बरेच तर्कवितर्क होते, पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता.

राष्ट्रीय कार्यकारिणी सुरू असतानाच ऐतिहासिक, पण अमानुष नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली. नोटबंदीमुळे भ्रष्टाचार नष्ट होईल असे सांगितले होते. काळा पैसा परत देशात येईल, अर्थव्यवस्था ‘कॅशलेस’ होईल, दहशतवाद संपून जाईल, असे सांगितले. हे सर्व खरेच झाले काय? यावर कार्यकारिणीत साधकबाधक चर्चा व्हायला काहीच हरकत नव्हती. या सगळ्या प्रकरणांत जनतेचे हाल झाले. त्यामुळे बेहाल जनतेचा विश्वास भाजपाने गमावला आहे. नोटबंदीमुळे अतिरेक्यांना अर्थपुरवठा करणारा अमली पदार्थांचा व्यापार बंद पडेल, असे जोरात सांगितले गेले. प्रत्यक्षात भाजपाचे हस्तक आणि पदाधिकारी हे अमली पदार्थांच्या व्यवहारात कसे गुंतले आहेत त्याचा पर्दाफाश मुंबईत रोज सुरू आहे' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in