'तुम्ही गोव्यात कितीही नोटा टाका, आम्ही....' देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी दिला शब्द

'तुम्ही गोव्यात कितीही नोटा टाका, आम्ही....' देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी दिला शब्द

गोवा विधानसभेची निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली आहे. फक्त गोवाच नाही तर उत्तर प्रदेशातही निवडणूक आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन नक्की होणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शरद पवार यांनीही भाजपला सत्तेतून खाली खेचावं लागणार असं स्पष्ट केलं आहे. आज तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना शब्दच दिला आहे.

'तुम्ही गोव्यात कितीही नोटा टाका, आम्ही....' देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी दिला शब्द
गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले....

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात आम्ही जनमत विकू देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. 'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले आहेत. ते तिथे गेल्यानंतरही आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष फुटला. मंगळवारी एका मंत्र्यांनी पक्ष सोडला. भाजप आमदार प्रवीम झांट्ये यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे आधी त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललं आहे बघावं. नोटांचा प्रश्न ते म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपचे लोक ज्याप्रकारे निवडणुकीत नोटांचा पाऊल पाडत आहेत आणि विशेषतः गोव्यात महाराष्ट्रातून बॅगा चालल्या आहेत त्यामुळे आम्ही नोटांशी नक्की लढू'

'गोव्यातल्या जनतेला आमचं आवाहन आहे की नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी पक्ष असलेला शिवसेना नोटांना पुरून उरेल. देवेंद्र फडणवीस यांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही तुमच्या नोटांशी लढू' असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'तुम्ही गोव्यात कितीही नोटा टाका, आम्ही....' देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी दिला शब्द
महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, गोव्यात आम्ही असं घडू देणार नाही-फडणवीस

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मला अतिशय आनंद आहे की आज गोविंद गावडे जे अपक्ष म्हणून निवडून आले होते व नंतर पाच वर्ष सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मतदार संघात कमळ फुलणार याबद्दल कुठलीही शंका नाही. एकूणच बघितलं तर सर्वे असेल किंवा ग्राउंड रिअलिटी असेल भाजपाचं सरकार हे गोव्यात पुन्हा स्थापित होणार, या बद्दल आता फारशी शंका कुणाच्या मनात उरली नाही. आम्ही जनतेमध्ये चाललो आहोत, आमच्या रचना लावतो आहोत, केलेली कामे सांगत आहोत आणि त्या आधारवर आम्ही मत मागत आहोत. गोव्यात राष्ट्रवादीची तृणमूल किंवा काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही. स्पष्ट बहुमत गोव्याची जनता ही भाजपला देईल आणि ज्या प्रकारे जनमताची चोरी तीन पक्षांनी महाराष्ट्रात केली, ती चोरी गोव्यात आम्ही होऊ देणार नाही.

असं देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी म्हटलं होतं. आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्या खास शैलीत उत्तर देत तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही लढायला तयार आहोत असं सुनावलं आहे. आता याबाबत देवेंद्र फडणवीस काही भाष्य करणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in