'नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला'

शिवसेना खासदार विनायक राऊत यांचं नारायण राणेंवर टीकास्त्र

'नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला'

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनीही आता नारायण राणेंच्या शिवसेनेवर टीका केल्याच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. या देशात पाठीत खंजीर खुपसणारा नेता म्हणजे नारायण राणे आहेत. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत असं म्हणत विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.


'नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला'
नारायण राणे डरपोक, घाबरून भाजपमध्ये गेले नवाब मलिक यांचं प्रत्युत्तर

नारायण राणे यांनी विश्वासघात करणं आणि पाठीत खंजीर खुपसणं याचा इतिहास निर्माण केला. त्यामुळे त्यांनी इतरांवर बोलू नये असंही विनायक राऊत यांनी सुनावलं आहे. गटारीचा महामेरू म्हणजे नारायण राणे आहेत. त्यांनी सगळ्या पक्षांशी गद्दारी केली. काँग्रेसमध्ये शिवसेनेसोबत गद्दारी करून गेलात ना? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर टीका केली होती. त्याला आता खासदार विनायक राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या भाषणांचे उल्लेख त्यांच्या पत्रकार परिषदेत केले. शरद पवारांसारखी लाचारी पत्करणार नाही हे उद्धव ठाकरे म्हणाले होते याची आठवण त्यांनी आज करून दिली. तसंच आज बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांचं गुणगान गात आहेत कारण काहीही कर्तृत्व नसताना पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. अशीही टीका नारायण राणेंनी केली. याबाबत ही विनायक राऊत यांनी राणेंचा समाचार घेतला आहे.

File Photo : pti

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खालच्या भाषेत उल्लेख करत नारायण राणेंनी टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. ते सगळं नारायण राणे सोयीस्करपणे विसरलेत का? भाजपमध्ये गेलात म्हणून स्वतःला शुद्ध विचारवंत समजू नका असंही राऊत यांनी सुनावलं आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय वैर होतं. मात्र व्यक्तीगत पातळीवर ते वैर नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी कायमच बारामतीच्या विकासाचं कौतुक केलं होतं. मुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर गेले असताना त्यांनीही विकास पाहिला आणि कौतुक केलं त्यात काय गैर आहे? असंही राऊत म्हणाले.

चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना कान टोचण्याची वेळ नारायण राणे यांनीच आणलीय, असं विनायक राऊत म्हणाले.चिपी विमानतळाची जमीन तुम्ही हडप करायला निघाला होतात,त्याचा भांडाफोड शिवसेनेने केला आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in