Cabinet Expansion : राणेंची राजकीय उंची त्यापेक्षाही मोठी, लघु-सूक्ष्म मंत्रालयावरुन शिवसेनेचा टोला

मंत्रीमंंडळाचा मूळ चेहरा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचाच - संजय राऊत
Cabinet Expansion : राणेंची राजकीय उंची त्यापेक्षाही मोठी, लघु-सूक्ष्म मंत्रालयावरुन शिवसेनेचा टोला

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला असून यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला ४ मंत्रीपद आलेली आहेत. भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने राणेंना मंत्रीपद दिल्याची चर्चा सुरु होती. शिवसेनेनेही आज राणेंना मिळालेल्या मंत्रीपदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"नारायण राणे यांची उंची खरं पहायला गेलं तर यापेक्षाही मोठी आहे. नारायण राणेंकडे सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवली आहेत. त्यामुळे देशातली सध्याची परिस्थिती पाहता राणेंसमोर कोरोना काळात कोलमडलेल्या अनेक छोट्या उद्योगांना संजीवनी देण्याचं आव्हान आहे", अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Cabinet Expansion : राणेंची राजकीय उंची त्यापेक्षाही मोठी, लघु-सूक्ष्म मंत्रालयावरुन शिवसेनेचा टोला
Cabinet Expansion : मंत्रीपद नाकारल्यामुळे प्रीतम मुंडे नाराज? सोशल मीडियावर कार्यकर्त्यांमध्येही नाराजी

शिवसेनेला शह देण्यासाठी राणेंना मंत्रीपद दिलं आहे का यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेला फटका बसण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. त्यांना देशाचं काम करण्यासाठी मंत्रीपद दिलं जातं. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिले जात असतील तर हे घटनाविरोधी आहे. मंत्रीपद राज्याचं आणि देशाचं असतं जे विकास आणि लोकांची कामं कऱण्यासाठी असतात,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आभार मानायला हवेत असाही टोला लगावला. "भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रीमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपात गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच आहे", असंही राऊत म्हणाले.

Cabinet Expansion : राणेंची राजकीय उंची त्यापेक्षाही मोठी, लघु-सूक्ष्म मंत्रालयावरुन शिवसेनेचा टोला
बिघडलंय तर इंजिन पण बदलले डबे ! Cabinet Expansion वरुन महाविकास आघाडीतल्या नेत्यांची मोदींवर टीका

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in