Bharat bandh: आज घरातच बसा! किती काळ चालणार 'भारत बंद'; काय सुरू, काय राहणार बंद?

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध आज संयुक्त कृषी मोर्चाकडून भारत बंदची हाक
Bharat bandh: आज घरातच बसा! किती काळ चालणार 'भारत बंद'; काय सुरू, काय राहणार बंद?
प्रातिधिनीक छायाचित्र

कित्येक महिन्यांपासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या संयुक्त किसान मोर्चाकडून आज 'भारत बंद' करण्यात येत आहे. शेतकरी संघटनाच्या माहितीप्रमाणे तिन्ही कृषी कायद्यांना वर्ष पूर्ण होत असून, यानिमित्ताने शेतकरी संघटनांनी बंदची हाक दिली. भारत बंदला विविध संघटनांकडून पाठींबा देण्यात आला आहे.

पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या भारत बंदला पाठींबा दर्शवला असून, ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. याचसोबत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सरकारनेही या बंदला पाठींबा दिला असून काँग्रेसही या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहे.

काय आहे भारत बंदची वेळ?

सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत 'भारत बंद' चालणार आहे. या काळात सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं, शैक्षणिक संस्था, इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहतील, तसेच सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत, असं आयोजकांनी स्पष्ट केलेलं आहे. या बंदमधून सर्व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेलं आहे. तसेच हा बंद शांततेच्या मार्गाने पूर्ण केला जाईल असंही संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आंध्र प्रदेश सरकारने भारत बंदला आपला पूर्ण पाठींबा दर्शवला असून आजच्या दिवसात आंध्र प्रदेशातील सार्वजनिक बससेवा दुपारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तिकडे तामिळनाडू सरकारनेही या बंदला पाठींबा दर्शवला असून शेतकरी, व्यापारी, शेतमजूर या सर्वांना त्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. याचसोबत केरळ सरकार आणि बिहारमध्ये विरोधी पक्षात असलेल्या तेजस्वी यादवही या बंदमध्ये सहभागी होतील.

महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान आजच्या बंदला All India Bank Officers’ Confederation ने देशील आपला पाठींबा दर्शवला असून संघटनेने सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधावा अशी विनंती केली आहे. आजचा संप यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. त्यामुळे या बंदला आता देशात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.