उल्हासनगर : धक्कादायक! 27 वर्षीय जावयाचा 45 वर्षीय सासूवर बलात्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उल्हासनगर शहरात नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. २७ वर्षीय जावयाने आपल्या ४५ वर्षीय सासूवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जावयाला या गोष्टीची कुणकुण लागताच तो फरार झाल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित सासू ही हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. जावईही उल्हासनगरमध्येच राहतो, लग्नापूर्वी जावयाचं सासूवर प्रेम जडलं होतं. परंतू लग्न करणं शक्य नसल्यामुळे आरोपीने पीडित सासूच्या मुलीला लग्नाची मागणी घातली. २०१८ साली आरोपी आणि पीडित सासूच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला.

यानंतर जावई आणि सासूमधले प्रेमसंबंध वाढायला लागले. काही महिन्यांनी जावयाने गोड-गोड बोलून सासुसोबत शारिरिरक संबंध प्रस्थापित केले. काही वर्षांनी जावई आणि सासूमध्ये काहीतरी घडत असल्याची कुणकुण घरच्यांना लागली होती. काही दिवसांनी दोघांमधली प्रेमप्रकरणाचं बिंग फुटल्यानंतर सासूने जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान पोलीस फरार जावयाचा शोध घेत असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली.

Crime : बहिणीची हत्या करुन मृतदेह ठेवला घरात, सोसायटीत दुर्गंधी पसरल्यामुळे झाला उलगडा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT