सोनू निगमला मुंबई महापालिका आयुक्तांच्या भावाकडून धमकी?; प्रकरण काय, चहल काय म्हणाले?

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक पद्मश्री सोनू निगम याला मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या चुलत भावाकडून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टच्या मुद्द्यावरून राजेंदर याने सोनू निगमला धमकी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता महापालिका आयुक्तांनीही खुलासा केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी त्यांचा चुलत भाऊ राजेंदरला सोनू निगमची भेट घालून दिली होती. या भेटीनंतर राजेंदरने सोनू निगमकडे परदेशात संगीत कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करण्याचा आग्रह केला होता.

सोनू निगमचं आंतरराष्ट्रीय कॉन्सर्टचं काम प्रमोटर रॉकी बघतो. त्यामुळे सोनू निगमने राजेंदरला प्रमोटरसोबत बोलून घेण्यास सांगितलं. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राजेंदरला सोनू निगमने दिलेलं उत्तर आवडलं नाही. त्यानंतर त्याने सोनू निगमला असभ्य भाषेत मेसेज पाठवले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोनू निगमला राजेंदरने पाठवलेल्या मेसेजमधील भाषा असभ्य असून, त्याच्या बोलण्याचा सूर धमकीवजा असल्याची माहिती आहे. राजेंदरने पाठवलेले मेसेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंगही सोनू निगमकडे असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका आयुक्तांबद्दल आदर असल्याने सोनू निगमने अद्याप तक्रार केलेली नाही.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर इक्बालसिंह यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. सोनू निगमला मिळालेल्या धमकी प्रकरणी बोलताना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले की, “राजेंदर हा ना माझा चुलत भाऊ आहे, ना माझा दूरचा नातेवाईक. हे मी जबाबदारीने सांगू शकतो. राजस्थानमध्ये जिथे माझा जन्म झाला, त्याच जिल्ह्यातील तो आहे. त्याने केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. इतकंच मला सांगायचं आहे. मी अशा गोष्टींमध्ये कधीच पडत नाही”, असं महापालिका आयुक्तांनी म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT