छत्तीसगड : भरधाव गाडीने जमावाला उडवलं, एकाचा मृत्यू; भीषण घटना कॅमेऱ्यात कैद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे संपूर्ण देश विजयादशमीचा सण साजरा करत असताना छत्तीसगडमध्ये दुर्गा मातेच्या विसर्जनाला गालबोट लागलं आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील पाथलगावमध्ये एका भरधाव गाडीने जमावाला उडवलं आहे, या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून हा भीषण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जशपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विजय अग्रवाल यांनी या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच या दुर्घटनेत १६ व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही जखमींना फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे.

ही दुर्घटना घडल्यानंतर या भागात तणावाचं वातावरण पसरलं होतं. संतप्त स्थानिक लोकांनी या भागात गाड्या जाळायला सुरुवात केली. जमावाला चिरडणाऱ्या कार चालकालाही स्थानिकांनी मारहाण केली. या घटनेनंतर संतप्त जमाव पाथलगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्यांनी निदर्शन करायला सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जमावाला चिरडणाऱ्या गाडीमध्ये गांजा होता असा आरोप स्थानिकांनी केला आहे. परंतू याबद्दलची चौकशी अद्याप सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलिसांनी या अपघाताप्रकरणी बबलू विश्वकर्मा आणि शिशुपाल साहू या दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांनीही या दुर्घटनेत दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT