८० हजार डॉलर्सच्या डिजीटल दरोड्यातील आरोपींना पकडण्यात सातारा पोलिसांना यश

८० हजार डॉलर्सच्या डिजीटल दरोड्यातील आरोपींना पकडण्यात सातारा पोलिसांना यश

पुणे, निपाणी, कराड, इचलकरंजी येऊन ९ आरोपींना पोलिसांनी केली अटक

सातारा जिल्ह्यातील चितळी, खटाव येथे युवकाला अडवून त्याच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, टॅब आणि ८० हजार डॉलर्सचा दरोडा टाकणाऱ्या ९ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. राज्यात अशा प्रकारे क्रिप्टो करन्सीचा डिटीजल दरोडा उघडकीस आणण्याचा हा पहिलाच प्रसंग मानला जात आहे.

पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ऋषी शेटे व त्याचा भाऊ हे दोघेही क्रिप्टो करन्सीचं ट्रेडिंग करतात. १९ डिसेंबरला तक्रारदार कारमधून उंब्रजकडे येत असताना चितळी गावाच्या हद्दीत त्यांना काही संशयितांनी अडवले. यावेळी संशयितांनी त्यांना मारहाण करत त्यांच्याजवळील मोबाईल, टॅब, घड्याळ जबरदस्तीने हिसकावून घेतलं. तसेच दोन्ही भावांकडे असलेल्या मोबाईल आणि टॅबचे पासवर्ड घेत आरोपींनी तक्रारदारांचे पाय बांधून त्यांना पुसेसावळी गावाच्या हद्दीत सोडून दिलं.

तक्रारदारांनी स्वतःची सुटका करुन घेतल्यानंतर घरी घेऊन स्वतःच्या क्रिप्टो करन्सीचा व्हॅलेट युजर आयडी आणि पासवर्ड टाकून पाहिलं असता त्यांच्या खात्यातील ८० हजार डॉलर हे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचं उघडकीस आलं. या घटनेनंतर तक्रारदारांनी सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्र फिरवत पुणे, कराड, इचलकरंजी, निपाणी इथून ९ संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या सर्व आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in