राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रूग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड

राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा बीड आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी आणि डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल असंही ते म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेन असे आवाहनही त्यांनी केले.ट

धनंजय मुंडे यांना रूग्णालयात दाखल केल्याचं कळताच अनेक राजकीय मंडळी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मुंबईत आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारणा केली. एवढंच नाही तर भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या चुलत बहीण पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि काळजी घेण्यास सांगितलं होतं.

ADVERTISEMENT

राज्याचे सामाजिक आणि न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी थकवा जाणवू लागला तसंच चक्करही आली. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. बुधवारी त्यांना आयसीयूतून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. अधिक ताणामुळे आणि कामाचा त्रास सहन केल्याने त्यांना चक्कर आणि थकवा आला होता. त्यांच्या अनेक आरोग्य चाचण्याही करण्यात आल्या. आज म्हणजेच शनिवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT