Narayan Rane यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक प्रकरणानंतर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी राणेंनी शिवसेनेसह मीडियावर देखील आपला संताप व्यक्त केला. पाहा नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे: 1. माझ्या चांगुलपणाचा अनेकांनी फायदा घेतला. त्यांच्याकडे नंतर पाहीन. 2. सिंधुदुर्गातून […]
ADVERTISEMENT
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अटक प्रकरणानंतर पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी राणेंनी शिवसेनेसह मीडियावर देखील आपला संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
पाहा नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे:
1. माझ्या चांगुलपणाचा अनेकांनी फायदा घेतला. त्यांच्याकडे नंतर पाहीन.
हे वाचलं का?
2. सिंधुदुर्गातून जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु होणार, दोन दिवसांचा गॅप घेतलाय फक्त.. दोन दिवसांनी यात्रेला पुन्हा सुरवात घेईन.
3. लक्षात ठेवा.. आम्ही तिघं घरी नसताना इथे आलात तुम्ही. पण तुम्हालाही मी कुणालाही घाबरत नाही, मी सगळ्यांन पुरुन उरलोय.
ADVERTISEMENT
4. शिवसेना माझं काहीही करु शकत नाही, मी त्यांच्या कोणत्याही कारवाईला घाबरत नाही.
ADVERTISEMENT
5. मला देशाबद्दल सार्थ अभिमान असल्याने मी तसा शब्द वापरला होता. पण मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वातंत्र्य दिनाबाबत माहित असू नये.
6. शिवसेनेच्या नेत्यांनी कधी असे शब्द उच्चारले नाहीत का?, मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं थोबाड फोडण्याची भाषा केली होती.
7. मुख्यमंत्र्यांनी योगींचं थोबाड फोडण्याची भाषा केली होती ती योग्य होती का? त्यांच्यावर आता कारवाई होणार का?
8. मी यापुढे जपून पावलं टाकणार आहे. माझ्या पत्रकार परिषदांची देखील टेप सोबत ठेवणार आहे. नाही तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो.
9. मी काही गुन्हा केलेलाच नाही. दोन्ही कोर्टाने म्हणजे काल महाड कोर्टाने आणि आज हायकोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला आहे.
10. संजय राऊत आणि शिवसेनेला मी 17 नंतर उत्तर देईन, कारण या प्रकरणी 17 तारखेला कोर्टात सुनावणी होणार आहे.
‘तुम्हाला घरं नाहीत? मुलं बाळं नाहीत? तेवढंच आठवणीत ठेवा’
‘चिपळूणला प्रचंड गर्दी असं सांगण्यात आलं होतं. 17 माणसं होती. त्याच्यापुढे 13 माणसं, प्रचंड प्रतिसाद. आमच्या घरावर किती माणसं आले नाही माहित नाही. पण पराक्रमी लोक किती आले होते मी व्हीडिओ क्लिप मिळवेन.’
मी सगळ्यांना पुरून उरलोय, शिवसेनेने विसरू नये-नारायण राणे
‘घरावर चालून येता? तुम्हाला घरं नाहीत? मुलं बाळं नाहीत? तेवढंच आठवणीत ठेवा असंही राणे यांनी म्हटलं आहे. मी तुम्हाला सगळ्यांना पुरून उरलोय हे लक्षात ठेवा. शिवसेना वाढली त्यात माझा सहभाग होता, तेव्हा आत्ताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही कुणी नव्हते. अनिल परब अधिकाऱ्याला आदेश देत होते. तुम्ही पाहिलं असेलच.’ असंही राणे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT