गणेशोत्सव २०२१ : रांजणगावच्या बाप्पाला ११११ चिकू आणि मोदकांचा महानैवेद्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तब्बल १० दिवस आपल्या लाडक्या बाप्पाचं कोडकौतुक केल्यानंतर आजच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याला निरोप देण्यात येतो. यंदा कोरोनामुळे मिरवणूकांवर बंदी घालण्यात आलेली आहे. घरगुती गणपतींचं विसर्जनही साध्या पद्धतीने होताना दिसतंय. अशातच अष्टविनायकांपैकी एक पुण्यातील रांजणगावच्या महागणपतीला आज खास ११११ चिकू आणि मोदकांचा महानैवेद्य दाखवण्यात आला.

ADVERTISEMENT

अनंत चतुर्दशीच्या निमीत्ताने आज रांजणगावच्या गणपती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळे मंदिराच्या गाभाऱ्याला एक वेगळंच मनमोहक रुप प्राप्त झालं होतं. ११११ चिकू आणि मोदकांचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला. यावेळी मोदक आणि चिकूंचीही आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली होती.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्व मंदिर बंद आहेत. रांजणगावचं गणपती मंदिरही भाविकांसाठी बंद होतं. परंतू गणपतीच्या १० दिवसांमध्ये मंदिरात दररोज नित्यनेमाने पुजा आणि सर्व विधी सुरु होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT