धक्कादायक ! बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट; साताऱ्यातील घटना
साताऱ्याच्या कोरेगाव येथे बारावीची दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहित पोपट शिंदे (वय २०) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. रोहितला उपचारासाठी पिंपोडा येथे ग्रामीण रुग्णालयात नेलं होतं, परंतू त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. रोहित आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वाई-वाठार रस्त्यावर वाघोलीत […]
ADVERTISEMENT
साताऱ्याच्या कोरेगाव येथे बारावीची दुसऱ्यांदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रोहित पोपट शिंदे (वय २०) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. रोहितला उपचारासाठी पिंपोडा येथे ग्रामीण रुग्णालयात नेलं होतं, परंतू त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. रोहित आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, वाई-वाठार रस्त्यावर वाघोलीत साधना शिंदे या हालाकीच्या परिस्थितीत हॉटेल चालवत आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात. त्यांना शुभम, विनोद आणि रोहीत अशी तीन मुलं आहेत. ही तिन्ही मुलं शिक्षण घेत आहेत. काल रात्री हॉटेलचं काम संपवून घरात स्वयंपाक करत असताना रोहितने खोलीचा दरवाजा बंद करुन आत्महत्या केली.
हे वाचलं का?
घरातील लोकांना या घटनेची जराही चाहूल लागली नाही. रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोहितच्या परिवाराने आणि मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. परंतू तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. यानंतर संतप्त जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलांनो वेळेचं गणित पाळा ! परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचल्यास प्रवेश मिळणार नाही
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT