अमरावती : Omicron च्या तपासणीसाठी तेरा नमुने दिल्लीला पाठवले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कडक करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात अमरावती शहरातून झाली होती.

ADVERTISEMENT

त्यामुळे स्थानिक यंत्रणेने खबरदारीचा उपाय म्हणून ज्या व्यक्तींचे CT Value ३० पेक्षा कमी आहे त्यांचे नमुने जिनॉम सिक्वेंन्सिंगसाठी दिल्लीला पाठवले आहेत. अमरावतीमधून १३ जणांचे नमुने दिल्लीला पाठवण्यात आल्याचं कळतंय.

Omicron Variant : कोरोना होऊन गेलेल्यांनाही ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो?

हे वाचलं का?

जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनो संक्रमितांचे नमुने पुण्याला बीजी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात येत होते. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जिल्ह्यात दुसऱ्या लाटेचं गंभीर संकट ओढवले होते. अमरावतीत सध्या परदेशातून सात जणं दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिका, दुबई यासारख्या देशातून प्रवासी अमरावतीत दाखल झाले आहेत.

Omicron Variant : 40 वर्षापुढील भारतीयांना बुस्टर डोस द्यायला हवा -जिनोम कॉन्सॉर्टियम

ADVERTISEMENT

यापैकी तीन प्रवाशांसोबत प्रशासनाने संपर्क साधला असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय. विमानतळावर या प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात आली होती, ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. सध्या या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. अमरावतीच्या विद्यापीठ प्रयोगशाळेच्या समन्वयक डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पॉझिटिव्ह असणाऱ्या १३ रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेसिंगसाठी दिल्लीला पाठविण्यात येत आहेत याचा अहवाल आठ ते दहा दिवसात मिळण्याची शक्यता आहेत

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT