पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांची धडक, भीषण अपघातात ३० प्रवासी ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाकिस्तानात दोन रेल्वे गाड्यांची धडक होऊन भीषण अपघातात ३० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दक्षिण पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की एका ट्रेनच्या धडकेमुळे दुसरी ट्रेन रुळावरुन खाली घसरली.

ADVERTISEMENT

घोटकी जिल्ह्यातून जात असताना सर सय्यद एक्स्प्रेसने मिल्लत एक्स्प्रेसला धडक दिली. रेती आणि डहार्की रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक गावकऱ्यांनी बचावकार्याला सुरुवात केली.

हा अपघात नेमका कशामुळे झाला यापाठीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. या अपघातात ४ मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळले. काही मृतदेह हे दोन बोग्यांमध्ये अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक यंत्रणांना बोगी कापणाऱ्या मशिन्स बोलवाल्या लागल्या. पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षातही रेल्वेचा मोठा अपघात झाला होता, ज्यात १९ प्रवासी मरण पावले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT