Parliament Attack: गोळ्यांच्या आवाजाने हादरलेलं संसद भवन, ‘त्या’ दहशतवादी हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: आजपासून 20 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच 13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तानातील 5 दहशतवाद्यांनी दिल्लीत लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद भवनाची गोळ्या झाडून दहशत पसरविण्याचा भ्याड प्रयत्न केला होता. देशावरील त्या दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत.

ADVERTISEMENT

यावेळी आपल्या जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांशी लढा देणाऱ्या आणि संसद भवनात दहशतवाद्यांचा घुसण्याचा डाव हाणून पाडणाऱ्या त्या 9 शूर सुपुत्रांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते आणि संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. 13 डिसेंबरच्या सकाळी एका पांढऱ्या अॅम्बेसेडर कारमध्ये पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी संसद भवनाच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला होता.

हे वाचलं का?

संसद भवनाच्या आत असलेल्या गेटची योग्य माहिती नसल्याने दहशतवादी ज्या पांढऱ्या रंगाच्या अॅम्बेसेडर कारमध्ये बसले होते त्यांनी गडबडीत उपराष्ट्रपतींच्या ताफ्याच्या गाडीलाच धडक दिली होती. त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांचा संशय आला होता.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही समजण्याच्या आतच गाडीतून उडी मारून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला होता. तोपर्यंत संसद भवनाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनीही प्रत्युत्तर गोळीबार सुरू केलेला. त्यावेळी अनेक खासदार आणि मंत्री हे सभागृहातच उपस्थित होते.

ADVERTISEMENT

ज्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणीही संसद परिसरातील त्यांच्या कार्यालयात उपस्थित होते, त्यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका सुरक्षित खोलीत पाठवून नंतर दहशतवादांविरोधात तात्काळ कारवाई सुरु केली होती.

ADVERTISEMENT

संसदेत घुसून दहशतवाद्यांना नेते आणि मंत्र्यांना लक्ष्य करायचे होते, परंतु सुरक्षा दलांच्या तत्परतेमुळे ते अपयशी ठरले आणि तिथेच मारले गेले. मात्र, यावेळी देशाचे 9 शूर जवानांनीही दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते.

जेपी यादव, मतबर सिंग, कमलेश कुमारी, नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, घनश्याम, बिजेंदर सिंग, देशराज यांसारखे वीर जवान देशावरील या दहशतवादी हल्ल्याचे मनसुबे उधळून लावताना शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्यात वृत्तसंस्था एएनआयचा कॅमेरामन विक्रम सिंह बिश्त यांचाही मृत्यू झाला होता.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अफजल गुरू असल्याचे तपासात उघड झाले होते. ज्याने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे आयएसआय कॅम्पमध्ये प्रशिक्षणही घेतले होते. त्याच्यावर या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदच्या गाझी बाबाने सोपवली होती. तपासात हे स्पष्ट झालं होतं की, संसदत परिसरात ठार झालेले दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक होते.

दहशतवादी मोड्युलचं मुंबई कनेक्शन, ड्रायव्हर म्हणून वावरत होता दहशतवादी समीर

संसदेवर झालेल्या या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सर्व तपासानंतर सुप्रीम कोर्टाने काश्मिरी दहशतवादी अफझल गुरूला संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. अखेर अफजल गुरूला 9 फेब्रुवारी 2013 रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT