”तृणमूल काँग्रेसचे 21 आमदार माझ्या संपर्कात, योग्य वेळेची वाट पाहतोय”; मिथुन चक्रवर्तींचा दावा
भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे 21 आमदार अजूनही त्यांच्याशी थेट संपर्कात असल्याचे म्हटले आहे. मिथुन चक्रवर्ती म्हणाले ‘मी हे आधी बोललो होतो आणि आताही म्हणतोय, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय.’ मिथुन चक्रवर्ती शनिवारी कोलकाता येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत […]
ADVERTISEMENT
भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे 21 आमदार अजूनही त्यांच्याशी थेट संपर्कात असल्याचे म्हटले आहे. मिथुन चक्रवर्ती म्हणाले ‘मी हे आधी बोललो होतो आणि आताही म्हणतोय, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय.’ मिथुन चक्रवर्ती शनिवारी कोलकाता येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले ”मला माहित आहे की तृणमूलच्या नेत्यांना पक्षात घेण्यास आक्षेप आहे. आम्ही कुजलेले बटाटे घेणार नाही, असे अनेकांनी सांगितले आहे. मी तीच चूक पुन्हा करणार नाही.
ADVERTISEMENT
नेमका आकडा सांगणार नाही…मिथुन चक्रवर्ती
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना विचारण्यात आले की, टीएमसीच्या बंडखोर आमदारांची संख्या वाढली आहे का? यावर चक्रवर्ती म्हणाले- ‘मी तुम्हाला अचूक संख्या सांगणार नाही, परंतु मी सांगू शकतो की संख्या 21 पेक्षा कमी नाही.’ मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केले.
ममतांचं विधान सार्थ ठरवलं…
सीबीआय आणि ईडीचा ‘गैरवापर’ होत आहे, परंतु यात पंतप्रधान मोदींचा हात नसल्याचं ममता बॅनर्जील म्हणाल्या होत्या. यावर मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘हो, मला वाटते तो बरोबर आहे. खरे तर पंतप्रधान हे करत नाहीत. न्यायालयाने निर्णय दिला आहे. आम्ही काय करू शकतो?’
हे वाचलं का?
नेमका आकडा सांगणार नाही…मिथुन चक्रवर्ती
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना विचारण्यात आले की, टीएमसीच्या बंडखोर आमदारांची संख्या वाढली आहे का? यावर चक्रवर्ती म्हणाले- ‘मी तुम्हाला अचूक संख्या सांगणार नाही, परंतु मी सांगू शकतो की संख्या 21 पेक्षा कमी नाही.’ मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केले.
ममतांचं विधान सार्थ ठरवलं…
सीबीआय आणि ईडीचा ‘गैरवापर’ होत आहे, परंतु यात पंतप्रधान मोदींचा हात नसल्याचं ममता बॅनर्जील म्हणाल्या होत्या. यावर मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘हो, मला वाटते तो बरोबर आहे. खरे तर पंतप्रधान हे करत नाहीत. न्यायालयाने निर्णय दिला आहे. आम्ही काय करू शकतो?’
ADVERTISEMENT
कर नाही त्याला डर कशाला- मिथुन चक्रवर्ती
”ममत बॅनर्जींना सांगावं लागेल की भाजपच्या बंगला ब्रिगेडने काय वाईट केले होते. मी हे आधीही सांगितले होते, जर तुम्ही काही चुकीचे केले नसेल, जर तुम्ही स्वच्छ असाल तर तुम्ही घरी जाऊन शांतपणे झोपू शकता, काहीही होणार नाही. पण काही पुरावे असतील तर तुम्हाला पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीही वाचवू शकत नाही.
ADVERTISEMENT
आता म्युझीक रिलीज झालं आहे, ट्रेलर लवकरच येईल
जुलै महिन्यात मिथुन चक्रवर्ती यांच्या वक्तव्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. महाराष्ट्रासारखा राजकीय बदल पश्चिम बंगालमध्ये होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे 38 आमदार भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संपर्कात असल्याचा दावा मिथुन च्रकवर्ती यांनी केला होता. यापैकी 21 आमदार असे आहेत जे मिथुन यांच्या थेट संपर्कात आहेत. मिथुन चक्रवर्ती याबाबत अधिक माहिती विचारली असता तो म्हणाले होते की, चित्रपटाच्या आधी म्युझीक आणि नंतर ट्रेलर रिलीज होतो. म्युझीक नुकतेच रिलीज झाले आहे. आता ट्रेलरची वाट पहा.
भाजपला मुस्लिम विरोधी म्हणण्याचे षडयंत्र
मिथुन पुढे म्हणाले ”मी मुंबईत झोपलो होतो. मला जाग आली आणि अचानक बातमी पाहिली, भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. काय झालं. ते इथे (बंगाल) देखील होऊ शकते. भाजपला मुस्लीमविरोधी म्हणणे हे निव्वळ षडयंत्र आहे, प्रत्यक्षात तसे काहीही नाही, असेही मिथुन म्हणाले. मिथुन यांनी गेल्या वर्षीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपच्या मुस्लीमविरोधी प्रतिमेवर प्रश्न विचारला असता मिथुन म्हणाले की, भाजप दंगली घडवते असा नेहमीच आरोप केला जातो. पण मी स्पष्टपणे सांगतो की हा केवळ कटाचा एक भाग आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT